Mahabreaking

🔴 BREAKING
Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक

Fatal accident: राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात : दोन जण जागीच ठार, एक तरुणी गंभीर जखमी

Fatal accident: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वर शुक्रवार, 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार,तर एक तरुणी गंभीर जखमी झाले आहेत.

Fatal accident

राहुल सोनोने

दिग्रस (बू) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वर शुक्रवार, 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार,तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मालेगावहून मेडशीकडे जात असलेली मोटारसायकल (क्रमांक MH-30 BV-5086) इरळा गावाजवळील सर्व्हिस रोडवर अचानक नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत मुकुंद श्रीकृष्ण बंड (18, रा. गुरुवार पेठ, पातूर, जि. अकोला) आणि अनुष्का गजानन केकन (18, रा. रिधोरा, ता. मालेगाव, जि. वाशिम) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर आरती रामेश्वर गंगावणे (18, रा. रिधोरा) ही गंभीर जखमी आहे. तिघेही मालेगाव येथील ट्युशन क्लास संपवून घरी परतत असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबल गोपाल हरणे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप रहाटे, हेडकॉन्स्टेबल राजाराम कालापाड, सुखनंदन तांबारे, तसेच डायल-112 चे विलास पवार आणि सत्यप्रकाश सुपारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरुणी तसेच दोघांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून मालेगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून मालेगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top