POCSO : शहरात आठवर्षीय अल्पवयीन बालिकेसोबत अश्लील कृत्य करून तिला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मिळालेल्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात ६० वर्षीय व्यक्तीविरुद्ध पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चॉकलेटचे आमिष, बालिकेला धमकी; बुलढाणा शहरात संतापजनक प्रकार उघड
बुलढाणा : शहरात आठवर्षीय अल्पवयीन बालिकेसोबत अश्लील कृत्य करून तिला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मिळालेल्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात ६० वर्षीय व्यक्तीविरुद्ध पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास आठवर्षीय बालिका शहरातील एका टपरीवर कुरकुरे आणण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी शेख मोहम्मद पीर मोहम्मद याने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून तिला दुकानात बोलावले. त्यानंतर तिच्यासोबत अश्लील कृत्य करून अयोग्य प्रकारे स्पर्श केल्याचा आरोप आहे. तसेच, याबाबत कोणाला सांगितल्यास मारहाण करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
व्हिडिओमुळे प्रकार उघडकीस
२३ ऑक्टोबरच्या रात्री या घटनेशी संबंधित व्हिडिओ समोर आल्याने प्रकरण उघडकीस आले. तक्रारदाराच्या भावाला मोबाईलवर एक व्हिडिओ प्राप्त झाला होता. त्यामध्ये परिसरातील एक दुकानदार अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करताना दिसत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. व्हिडिओतील मुलीचे कपडे पाहून तक्रारदाराला संशय आला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बालिकेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर या प्रकरणी २४ ऑक्टोबर रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपी शेख मोहम्मद पीर मोहम्मद याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ७४, ७५ आणि ३५१(२), तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पोक्सो), २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुषमा पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला असून, बुलढाणा शहर पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करीत आहेत.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

