bus stand in trouble: पुणे–नागपूर महामार्गावरील बीबी येथील बसथांबा विविध मूलभूत सुविधांच्या अभावामुळे दिवसेंदिवस समस्यांच्या गर्तेत सापडत आहे. सिंदखेडराजा–मेहकर मार्गावरील या महत्त्वाच्या थांब्यावर जालना, संभाजीनगर, अमरावती, नागपूर अशा लांब पल्ल्याच्या सर्वच बसगाड्या थांबत असल्याने येथे सतत प्रवाशांची गर्दी पहावयास मिळते. मात्र, बसथांब्यावर बसण्याची व्यवस्था, स्वच्छ व सुलभ शौचालये नसल्याने प्रवासी रस्त्याच्या कडेला उभे-बसलेले दिसतात. विशेषत: महिला प्रवाशांना शौचालयाच्या अभावामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. असलेले मुत्रीघरही अत्यंत अस्वच्छ असून उपयोगात नसल्यासारखे झाले आहे.

वृद्ध, महिला व बालकांची प्रचंड गैरसोय
रमेश खंडागळे
बीबी : पुणे–नागपूर महामार्गावरील बीबी येथील बसथांबा विविध मूलभूत सुविधांच्या अभावामुळे दिवसेंदिवस समस्यांच्या गर्तेत सापडत आहे. सिंदखेडराजा–मेहकर मार्गावरील या महत्त्वाच्या थांब्यावर जालना, संभाजीनगर, अमरावती, नागपूर अशा लांब पल्ल्याच्या सर्वच बसगाड्या थांबत असल्याने येथे सतत प्रवाशांची गर्दी पहावयास मिळते. मात्र, बसथांब्यावर बसण्याची व्यवस्था, स्वच्छ व सुलभ शौचालये नसल्याने प्रवासी रस्त्याच्या कडेला उभे-बसलेले दिसतात. विशेषत: महिला प्रवाशांना शौचालयाच्या अभावामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. असलेले मुत्रीघरही अत्यंत अस्वच्छ असून उपयोगात नसल्यासारखे झाले आहे.
बसथांब्याभोवती खाजगी वाहनधारकांची अनधिकृत पार्किंग आणि लघुउद्योजकांच्या रस्त्याकडील दुकानांमुळे बस थांबवण्यासाठी चालकांना जागाच मिळत नाही. परिणामी अनेक चालकांना ठराविक थांबा टाळून काही फर्लांग पुढे बस थांबवावी लागते. यामुळे बस पकडण्यासाठी प्रवाशांना धाव घ्यावी लागते. यात लहान मुले, महिला व वृद्धांचे जीव धोक्यात येत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. प्रवाशांनी प्रशासनाला स्पष्ट मागणी केली आहे की, बसगाड्या अधिकृत थांब्यावरच थांबतील, यासाठी वाहतूक विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, जेणेकरून होणारी गैरसोय व संभाव्य अपघात टाळता येतील.

