Police raid: अंधारसांगवी येथील शेतशिवारात आणि नाल्यालगत सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूनिर्मितीवर चान्नी पोलिसांनी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी धडक कारवाई केली. गावातील दोन ठिकाणी पंचांच्या उपस्थितीत छापे टाकून पोलिसांनी ३३० लिटर सडवा मोहाचे रसायन, ३३ पत्र्याचे पिपे आणि भट्टीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण अंदाजे ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अवैध दारूनिर्मितीवर चान्नी पोलिसांचा प्रहार; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल
राहुल सोनोने
दिग्रस बु. : अंधारसांगवी येथील शेतशिवारात आणि नाल्यालगत सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूनिर्मितीवर चान्नी पोलिसांनी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी धडक कारवाई केली. गावातील दोन ठिकाणी पंचांच्या उपस्थितीत छापे टाकून पोलिसांनी ३३० लिटर सडवा मोहाचे रसायन, ३३ पत्र्याचे पिपे आणि भट्टीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण अंदाजे ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईप्रकरणी मोतीराम पांडुरंग लठाड (वय ६०) आणि महादेव रतन जामकर (वय ४२), दोघेही रा. अंधारसांगवी, ता. पातूर, जि. अकोला, यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(ड) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा चान्नी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी धनराज देवर्जनकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात पोलीस हवालदार रवी घुगे, पोलीस हवालदार राहुल वाघ, पोलीस शिपाई राहुल महाजन, शिवाजी कालवे आणि महिला पोलीस शिपाई स्वाती यांचा समावेश होता.
गावठी हातभट्टी आणि अवैध दारूनिर्मितीविरोधात चान्नी पोलिसांकडून यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

