Suspicion over : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने घरातच दोरीने गळा आवळून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना किनगाव राजा येथे घडली. या प्रकरणी किनगाव राजा पोलिसांनी आरोपी पती विजय संजय दाभाडे (वय ३१, रा. सावखेड तेजन, ता. सिंदखेड राजा) याला अटक करून ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दारूचे व्यसन अन् संशयाचे भूत; किनगाव राजा येथे पत्नीच्या हत्येने खळबळ
दुसरबीड : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने घरातच दोरीने गळा आवळून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना किनगाव राजा येथे घडली. या प्रकरणी किनगाव राजा पोलिसांनी आरोपी पती विजय संजय दाभाडे (वय ३१, रा. सावखेड तेजन, ता. सिंदखेड राजा) याला अटक करून ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय संजय दाभाडे आणि त्याची पत्नी संजीवनी विजय दाभाडे (वय २३) हे मूळचे सावखेड तेजन येथील रहिवासी असून, सध्या किनगाव राजा येथे राहत होते. आरोपी विजय याला दारूचे व्यसन होते. त्यातूनच पत्नी दुसऱ्या व्यक्तीशी मोबाईलवर बोलत असल्याने तिचे कोणासोबत तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला होता. याच संशयातून २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजण्यापूर्वी त्याने घरातच दोरीने पत्नीचा गळा आवळून तिचा खून केल्याची फिर्याद पोलिसांत देण्यात आली आहे.
याप्रकरणी फिर्यादी सुधाकर विठोबा वाघमारे (वय ५५, रा. हिवरखेड पूर्णा, ता. सिंदखेड राजा) यांनी २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता दिलेल्या तक्रारीवरून किनगाव राजा पोलीस ठाण्यात अप. क्र. ३७४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची कारवाई
बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक गायकवाड आणि देऊळगाव राजा विभागाचे पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला.
किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय मातोंडकर यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले. या पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल नागरे, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष गिते, गणेश वारकरी, संदीप डोंगरे आणि मिलिंद सोनपसारे यांचा समावेश होता. पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपी विजय संजय दाभाडे याला अटक केली.
या प्रकरणाचा पुढील तपास किनगाव राजा पोलीस करीत आहेत.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

