Mahabreaking

[breaking_news]

police investigation :‘लग्न कर, अन्यथा फोटो व्हायरल करीन’; गारगुडीतील प्रकाराने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू

police investigation : लग्न करण्यासाठी दबाव आणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिल्याचा तसेच घरात घुसून महिलेशी गैरवर्तन केल्याचा प्रकार देऊळगाव राजा तालुक्यातील गारगुडी येथे समोर आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात भगवान प्रकाश जायभाये (रा. किन्ही ताठे, ता. जाफ्राबाद, जि. जालना) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Soybean

घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप; जेसीबीने जिवंत गाडण्याची धमकी दिल्याची तक्रार

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : लग्न करण्यासाठी दबाव आणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिल्याचा तसेच घरात घुसून महिलेशी गैरवर्तन केल्याचा प्रकार देऊळगाव राजा तालुक्यातील गारगुडी येथे समोर आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात भगवान प्रकाश जायभाये (रा. किन्ही ताठे, ता. जाफ्राबाद, जि. जालना) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरात घुसून गैरवर्तन केल्याचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय फिर्यादी महिला आणि आरोपी यांची पूर्वीपासून ओळख आहे. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी राहत असलेल्या तिच्या आईच्या घरी आला. त्यावेळी त्याने मोठ्या आवाजात बोलत फिर्यादीवर आपल्यासोबत लग्न करण्यासाठी दबाव आणल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तसेच, लग्नास नकार दिल्यास तिचे फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपी घरात घुसला आणि फिर्यादीला पकडून तिची साडी ओढून खाली पाडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार सुरू असताना फिर्यादीची आई मध्यस्थी करण्यासाठी आली असता, आरोपीने तिच्यासोबतही धक्काबुक्की करून मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

जेसीबीने जिवंत गाडण्याची धमकी दिल्याचा आरोप

या प्रकरणात आरोपीने जेसीबी मशीन आणून जिवंत गाडून टाकण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आरोपी पुन्हा घरासमोर आला. त्यावेळी फिर्यादीने आपल्यासोबत लग्न करावे, अन्यथा तिचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकून व्हायरल करून बदनामी करेल, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याशिवाय, स्वतःच्या जिवाचे बरेवाईट करून त्यासाठी फिर्यादीच्या कुटुंबीयांची नावे घेण्याची धमकीही आरोपीने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे संबंधित महिला आणि तिच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे तक्रारीतून समोर आले आहे.

देऊळगाव राजा पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकरणी महिलेच्या तोंडी तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०४६९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३३३, ७४, ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, तक्रारीतील आरोपांची पडताळणी केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top