Dilip Sanap appointed: आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात संघटन बळकटीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अंढेरा येथील माजी पंचायत समिती सदस्य प्रा. दिलीप किसनराव सानप यांची खामगाव व शेगाव तालुक्यांच्या पक्षनिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती आमदार मनोज कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्हाध्यक्ष ऍड. नाझेर काजी यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली.

देऊळगाव राजा : आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात संघटन बळकटीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अंढेरा येथील माजी पंचायत समिती सदस्य प्रा. दिलीप किसनराव सानप यांची खामगाव व शेगाव तालुक्यांच्या पक्षनिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती आमदार मनोज कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्हाध्यक्ष ऍड. नाझेर काजी यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली.
प्रा. सानप हे कार्यकर्त्यांशी थेट संवाद, स्थानिक पातळीवरील सक्रियता आणि मजबूत संघटन कौशल्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या अनुभवाचा आगामी निवडणुकांमध्ये निश्चितच फायदा होणार असल्याचा विश्वास पक्षात व्यक्त करण्यात आला आहे.
त्यांच्या नियुक्तीमुळे खामगाव व शेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला आगामी निवडणुकांमध्ये भक्कम यश मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

