Mahabreaking

[breaking_news]

Clash breaks :सावखेड भोईत शेतजमीन व विहिरीच्या वादातून राडा; विळा, चाकू अन् काठ्यांनी हल्ला केल्याचा आरोप

Clash breaks : तालुक्यातील सावखेड भोई येथील शेतशिवारात शेतजमीन आणि विहिरीच्या वादातून दोन गटांत संघर्ष झाल्याची घटना समोर आली आहे. विहिरीतील पाण्याच्या उपशावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याचा आरोप असून, या प्रकरणात महिलेच्या पतीच्या डोक्यात विळा मारून जखमी करणे, नातेवाइकांना मारहाण करणे तसेच पाळीव कुत्रा अंगावर सोडून चावा घेण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपांवरून नऊ जणांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

accident

 पतीसह नातेवाइकांना मारहाण, पाळीव कुत्रा अंगावर सोडल्याचाही आरोप

गजानन तिडके

 देऊळगाव राजा :  तालुक्यातील सावखेड भोई येथील शेतशिवारात शेतजमीन आणि विहिरीच्या वादातून दोन गटांत संघर्ष झाल्याची घटना समोर आली आहे. विहिरीतील पाण्याच्या उपशावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याचा आरोप असून, या प्रकरणात महिलेच्या पतीच्या डोक्यात विळा मारून जखमी करणे, नातेवाइकांना मारहाण करणे तसेच पाळीव कुत्रा अंगावर सोडून चावा घेण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपांवरून नऊ जणांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. अरुणा कारभरी डोणे (वय ४१, रा. सावखेड भोई) आणि आरोपी यांच्यात शेतजमीन व विहिरीवरून न्यायालयात वाद सुरू आहे. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान सावखेड भोई येथील शेतशिवारात हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

 विहिरीतील पाण्याच्या उपशावरून वाद

फिर्यादीच्या पतीच्या विहिरीत कोणीतरी मोटार टाकून पाण्याचा उपसा केल्याचा संशय आल्याने ते फोनवरून चौकशी करीत होते. त्यावेळी आरोपी क्रमांक १ ते ४ घटनास्थळी आले. त्यांनी फिर्यादीच्या पतीला विहिरीवर येण्याबाबत जाब विचारत शिवीगाळ केली आणि मारहाण करून त्यांचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकारानंतर फिर्यादीचे पती घरी परतले असता, आरोपी क्रमांक १ ते ९ यांनी कथितरीत्या बेकायदेशीर जमाव जमवून हातात विळा, चाकू आणि काठ्या घेऊन फिर्यादीच्या घरी धडक दिली. यावेळी शिवीगाळ करून फिर्यादी व त्यांच्या नातेवाइकांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय आरोपी क्रमांक १ याने फिर्यादीच्या दिराचा डावा हात जोराने पिळून दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद आहे. इतर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाइकांना काठ्यांनी तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

पाळीव कुत्रा अंगावर सोडल्याची तक्रार

मारहाणीच्या वेळी फिर्यादीच्या अंगावर पाळीव कुत्रा सोडण्यात आला आणि त्या कुत्र्याने फिर्यादीला चावा घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर संबंधितांनी उपचार घेतले आणि त्यानंतर १४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९.३७ वाजता देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.

नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; तपास सुरू

या प्रकरणी काशिनाथ रघुनाथ डोणे (वय २४), सोमिनाथ रघुनाथ डोणे (वय २२), शिवानी रघुनाथ डोणे (वय २०), मीना रघुनाथ डोणे (वय ४०), रघुनाथ तुकाराम डोणे (वय ४२), रुखमिनी तुकाराम डोणे (वय ३६), सत्याभामा तुकाराम डोणे (वय ६९), मुरलीधर अहिंदे (वय ६५, रा. दरेगाव, ता. जि. जालना) आणि शिवाजी हंडे (रा. सावखेड भोई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम ११८(१), ७४, २९६, ११५(२), ३५२, २९१, १८९(१), ३५१(२), ३५१(३) आणि ११९(१) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन काकड यांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकार करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top