Mahabreaking

[breaking_news]

 Chhagan Bhujbal :छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त समता परिषदेचा सेवाभावी उपक्रम; गोशाळेतील जनावरांना चारा, वन्यजीवांसाठी पाण्याची व्यवस्था

Chhagan Bhujbal : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ओबीसी समाजाचे नेते तथा महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनरावजी भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त गुगळादेवी येथे सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गोशाळेतील जनावरांसाठी मोफत चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली, तर वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी पाण्याची सोय करण्यात आली.

chagan

 वाढदिवसाचा अनोखा सामाजिक संदेश! गुगळादेवी येथे मुक्या प्राण्यांसाठी समता परिषदेचा पुढाकार

गजानन तिडके

देऊळगाव राजा : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ओबीसी समाजाचे नेते तथा महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनरावजी भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त गुगळादेवी येथे सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गोशाळेतील जनावरांसाठी मोफत चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली, तर वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी पाण्याची सोय करण्यात आली.

 Chhagan

वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ उत्सव साजरा न करता मुक्या प्राण्यांच्या सेवेतून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याबरोबरच वन्यजीवांसाठी पाण्याची व्यवस्था करून समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्राणीसेवेचा आदर्श घालून दिला.

chhagan

समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

या उपक्रमावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ खांडेभराड, तालुकाध्यक्ष सदाशिव मुंडे, शहराध्यक्ष सुनील शेजुळकर, स्थायी समिती सदस्य राजेंद्र खांडेभराड, आरोग्य सभापती संदीप शिंदे, विकास कासारे, गौरव गीते, अफरोज खान, रमेश जावळे, अजगर शहा, सतीश झिने, अक्षय कायंदे, बबलू जायभाये, प्रभाकर घडलिंग, संतोष खरात, अविनाश भावसार, ज्ञानेश्वर तिडके, ज्ञानेश्वर खांडेभराड, विजय झोरे, दीपक खरात, सतीश राऊत, अमोल वाघमारे, योगेश खांडेभराड, केतन भागवत, भानदास माने, अनिकेत खांडेभराड आणि हर्षल मोहिते यांच्यासह समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकीतून प्राणीसेवेचा संदेश

मुक्या प्राण्यांची काळजी घेणे, त्यांना चारा उपलब्ध करून देणे आणि वन्यजीवांसाठी पाण्याची सोय करणे ही काळाची गरज आहे. वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक कार्यासोबतच प्राणीमात्रांप्रती संवेदनशीलता जपण्याचा संदेश देण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top