Banana prices drop: तालुक्यात दरवर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीनुकसान होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणावर केळी लागवड केली होती. मात्र, बाजारात केळीला योग्य असा भाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले असून तळेगाव बाजार परिसरातील शेतकरी श्रीकृष्ण गावंडे यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रावरील उभे केळीपिक कापून टाकण्याचा निर्णय घेतला.

तेल्हारा : तालुक्यात दरवर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीनुकसान होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणावर केळी लागवड केली होती. मात्र, बाजारात केळीला योग्य असा भाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले असून तळेगाव बाजार परिसरातील शेतकरी श्रीकृष्ण गावंडे यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रावरील उभे केळीपिक कापून टाकण्याचा निर्णय घेतला.
तालुक्यातील बागायती शेतकऱ्यांनी या वर्षी उत्पादन वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. केळी लागवडीसाठी त्यांनी पिक कर्ज काढले, मशागत केली आणि खर्चिक औषधोपचार केले. सुरुवातीला काही दिवस शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळाले. मात्र सध्या एक नंबर केळीला फक्त ३५० रुपये, तर दोन नंबर केळीला केवळ २०० रुपये असा तुटपुंजा दर मिळत असल्याने उत्पादनखर्चही निघत नाही.
या परिस्थितीत शेतकरी श्रीकृष्ण गावंडे यांनी “अशा भावात शेती करणे परवडत नसल्याने” दोन एकर केळीपिकासहित कापून टाकल्याचे सांगितले. शासनाचे शेतकऱ्यांकडे कोणतेच लक्ष नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांना या संकटातून दिलासा देण्यासाठी एकरी एक लाख रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
या संदर्भात शेतकरी अरुण खारोडे (ता. तळेगाव बाजार) म्हणाले,
“मी पाच एकर क्षेत्रावर केळी लागवड केली. उत्पादन वाढेल या आशेने दिवसरात्र मेहनत घेतली. मात्र कापणीच्या वेळी एक नंबर मालाला फक्त ३५० रुपये आणि दोन नंबर केळीस २०० रुपये दर मिळत आहे. अशा परिस्थितीत आम्ही करावे तरी काय? शासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी.”

