Mahabreaking

🔴 BREAKING
Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक

Woman attempts : रस्ता न मिळाल्याने महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेने वाचले प्राण!

Woman attempts : पातुर तालुक्यातील अतिदुर्गम सावरगाव येथे मंजुळा जानकीराम डाखोरे या महिलेने रस्ता न मिळाल्यामुळे अखेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मात्र चान्नी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे तिचा जीव वाचवण्यात आला.

Woman attempts

सावरगाव  येथील धक्कादायक घटना

दिग्रस बू : पातुर तालुक्यातील अतिदुर्गम सावरगाव येथे मंजुळा जानकीराम डाखोरे या महिलेने रस्ता न मिळाल्यामुळे अखेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मात्र चान्नी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे तिचा जीव वाचवण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार, महिलेच्या घरासमोरील एका व्यक्तीने घरकुलाचे बांधकाम केल्याने तिच्या घराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. या संदर्भात डाखोरे यांनी ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

या निष्क्रियतेविरोधात डाखोरे यांनी दोन वेळा आमरण उपोषण केले होते — पहिल्यांदा २१ ते २२ जुलै, तर दुसऱ्यांदा १५ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट या कालावधीत एकूण १४ दिवस. तत्कालीन गटविकास अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी रस्ता मोकळा करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले. परंतु दोन महिने उलटूनही रस्ता मोकळा करण्यात आला नाही.

यानंतर संतप्त झालेल्या महिलेने चान्नी पोलीस व प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा देणारे स्मरणपत्र दिले होते. अखेर १३ नोव्हेंबर रोजी सावरगाव ग्रामपंचायत परिसरात तिने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र ठाणेदार रवींद्र लांडे यांनी आधीच घटनास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तिचे प्राण वाचवले.

या प्रकरणी ठाणेदार लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उज्वला इटीवाले, सौंदर्या बेसरकार, गीते महादेव देशमुख, उमेश सांगळे आदींनी महिलेवर कारवाई करून तिच्याविरुद्ध आत्मदहनाचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

  “माझ्या मृत्यूला जबाबदार प्रशासनच!” — महिलेचा इशारा

मंजुळा डाखोरे यांनी रस्ता मिळवण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष केला. तरीही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने त्यांनी आत्मदहनाचा मार्ग पत्करला. आपल्या स्मरणपत्रात त्यांनी नमूद केले आहे की, “जर माझा मृत्यू झाला, तर खोटे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास भाग पाडणारे तत्कालीन अधिकारी व पदाधिकारीच जबाबदार राहतील.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top