Mahabreaking

[breaking_news]

Shubham Jaybhaye शुभम जायभाये यांची भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड; संघटनात्मक अनुभवाची पक्षाकडून दखल

Shubham Jaybhaye भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, देऊळगाव राजा येथील इंजि. शुभम सुधाकर जायभाये यांची भाजपा युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे युवा मोर्चाचे प्रभारी सुनील राणे आणि प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक यांनी प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. विदर्भातून प्रदेश पातळीवर शुभम जायभाये यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Shubham Jaybhaye

देऊळगाव राजाच्या शुभम जायभायेंवर भाजपची मोठी जबाबदारी; युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

गजानन तिडके

देऊळगाव राजा : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, देऊळगाव राजा येथील इंजि. शुभम सुधाकर जायभाये यांची भाजपा युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे युवा मोर्चाचे प्रभारी सुनील राणे आणि प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक यांनी प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. विदर्भातून प्रदेश पातळीवर शुभम जायभाये यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

शुभम जायभाये यांनी यापूर्वी भाजपा अभियंता सेल, महाराष्ट्र प्रदेश संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक काम करत अभियंता वर्गाशी संपर्क वाढविणे, संघटन मजबूत करणे तसेच पक्षाच्या विविध उपक्रमांना व्यापक स्वरूप देण्यासाठी योगदान दिले आहे.

प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शुभम जायभाये यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, कामगार मंत्री आकाश फुंडकर, युवा मोर्चाचे प्रभारी सुनील राणे, भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय कुटे, आमदार श्वेता महाले, विदर्भ संयोजक दिनेश सूर्यवंशी आणि युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक यांचे विशेष आभार मानले.

प्रत्येक युवकापर्यंत पोहोचण्याचा संकल्प

निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना शुभम जायभाये म्हणाले, “पक्षाने माझ्यावर सोपविलेली ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शेवटच्या युवकाशी संपर्क साधण्याच्या संकल्पनेनुसार राज्यातील प्रत्येक युवकापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने काम करणार आहे. युवकांना संघटनेशी जोडण्यासोबतच त्यांच्या प्रश्नांना आणि अपेक्षांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.”

शुभम जायभाये यांच्या निवडीमुळे देऊळगाव राजा तसेच बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top