Prahlad Kapre : बुलढाणा तालुक्यातील मासरूळ हे गाव सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील सुपुत्र प्रल्हाद कापरे यांनी भारतीय सैन्यदलात तब्बल १७ वर्षे सेवा बजावत जम्मू-काश्मीर, गुजरातसह देशातील विविध राज्यांमध्ये कर्तव्य बजावले. ऑक्टोबर २०२६ मध्ये ते भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले. देशसेवा करून गावात परतलेल्या या सुपुत्राचा ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला.

देशसेवेचा अभिमान! सेवानिवृत्त जवान प्रल्हाद कापरे यांचा मासरूळवासीयांकडून सत्कार
पंडित सावळे
मासरूळ : बुलढाणा तालुक्यातील मासरूळ हे गाव सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील सुपुत्र प्रल्हाद कापरे यांनी भारतीय सैन्यदलात तब्बल १७ वर्षे सेवा बजावत जम्मू-काश्मीर, गुजरातसह देशातील विविध राज्यांमध्ये कर्तव्य बजावले. ऑक्टोबर २०२६ मध्ये ते भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले. देशसेवा करून गावात परतलेल्या या सुपुत्राचा ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला.
गावातील तरुण पिढीने प्रल्हाद कापरे यांच्या देशसेवेचा आदर्श घ्यावा, तसेच सेवानिवृत्त सैनिकाप्रती आणि भारतीय सैन्यात सेवा बजावणाऱ्या सर्व जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी, या उद्देशाने ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी त्यांच्या सत्काराचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार मासरूळ येथील माजी सरपंच शेषराव सावळे, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप सरपंच, मधुकर महाले, हरिभाऊ सिनकर, प्रकाश राऊत, संजीव बोडखे, कृष्णा सिनकर, मधुकर सिनकर, किरण उगले, नंदकिशोर देशमुख, संभाजी देशमुख, सुनील सावळे, विलास भगत, सदा भगत, सतीश नागपुरे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थांच्या हस्ते सेवानिवृत्त सैनिक प्रल्हाद कापरे व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांच्या त्यागाची जाणीव करून देण्यात आली. घरोघरी विविध सण-उत्सव आनंदात साजरे होत असताना देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांना मात्र सण-उत्सवापेक्षा देशाच्या सुरक्षेचे कर्तव्य महत्त्वाचे असते. देशाचे रक्षण करणे हेच त्यांचे एकमेव ध्येय असते.
“प्रल्हाद भाऊ कापरे यांनी १७ वर्षे देशाची सेवा करून निवृत्ती घेतली. ही बाब संपूर्ण गावासाठी अभिमानाची आहे,” असे माजी सेवानिवृत्त सैनिक संजीव बोडखे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
प्रल्हाद कापरे यांच्या देशसेवेबद्दल ग्रामस्थांनी अभिमान व्यक्त करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेतून गावातील तरुणांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

