Chandrakant Patil : बुलढाणा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम ठेवण्यासाठी तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये ठाणेदारांची अदलाबदल केली आहे. या बदल्यात लोणार तालुक्यातील बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी कर्तव्यदक्ष व अनुभवी अधिकारी चंद्रकांत भरत पाटील हे नवे ठाणेदार म्हणून रुजू झाले आहेत.

बीबी :बुलढाणा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम ठेवण्यासाठी तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये ठाणेदारांची अदलाबदल केली आहे.
या बदल्यात लोणार तालुक्यातील बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी कर्तव्यदक्ष व अनुभवी अधिकारी चंद्रकांत भरत पाटील हे नवे ठाणेदार म्हणून रुजू झाले आहेत.
चंद्रकांत पाटील हे १०६व्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी २०१० साली महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून २०११ साली शासकीय सेवेत प्रवेश केला. याआधी ते सोनाळा पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते. तेथे त्यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही स्वतंत्र कारवायांमध्ये जिवंत काडतुसे तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता.
त्याआधी त्यांनी धुळे, नाशिक आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. आता बीबी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात घडणाऱ्या घटनांवर ते कसे नियंत्रण आणतात, याकडे स्थानिक जनतेचे लक्ष लागून आहे.

