Police arrest nine accused: येथून जवळ असलेल्या नागापूर गावातील अंजनी बु. शेतशिवारात १० नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण हाणामारीत एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी आणि सहा जण जखमी झाले होते. या घटनेनंतर डोणगाव पोलिसांनी त्वरीत कारवाई करत या हाणामारीतील नऊ आरोपींना अटक केली आहे.

डोणगाव : येथून जवळ असलेल्या नागापूर गावातील अंजनी बु. शेतशिवारात १० नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण हाणामारीत एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी आणि सहा जण जखमी झाले होते. या घटनेनंतर डोणगाव पोलिसांनी त्वरीत कारवाई करत या हाणामारीतील नऊ आरोपींना अटक केली आहे.
फिर्यादी विकार खा जाबीर खा पठाण (वय १८, रा. मंगरुळ नवघरे, ता. चिखली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अंजनी बु. शिवारातील शेतीच्या वादावरून त्यांचे आणि काही नातेवाईकांचे आरोपींशी वाद झाले. या वादात आरोपींनी शेतात येऊन शिवीगाळ, धमक्या देत लोखंडी रॉड आणि लाकडी काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादींचे काका सय्यद अयास सय्यद वाहेद गंभीर जखमी झाले व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणात सय्यद मंजूर सय्यद बिराम (४५), सय्यद आसिफ सय्यद मंजूर (२५),सय्यद समीर सय्यद बशीर (३५),सय्यद रहीम सय्यद बिराम (४५),सय्यद इमरान सय्यद रहीम (२८),सय्यद रफिक सय्यद मुनाफ (५०), अरेफाबी सय्यद मंजूर (३५)फरीदाबी सय्यद जमीर (३५),सुलतानाबी सय्यद रहीम (३५)वरील सर्व आरोपी रा. नागापूर (ता. डोणगाव) असून, त्यांच्याविरुद्ध डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये कलम 103(1), 109(1), 189(2), 189(4), 191(2), 191(3), 190, 296, 351(2) BNS अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास ठाणेदार अमरनाथ नागरे करीत आहेत.दरम्यान, दुसऱ्या बाजूने सय्यद इमरान सय्यद रहीम (रा. नागापूर) यांनी दिलेल्या प्रतितक्रारीनुसार, विकार खा पठाण आणि त्यांचे नातेवाईक यांनीदेखील शेतातील वादादरम्यान हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी १० आरोपींवर कलम 118(1), 189(2), 191(2), 191(3), 190, 352 BNS अंतर्गत गुन्हा नोंदविला असून, तपास पो.हे.का. संजय धिके यांच्याकडे देण्यात आला आहे.
या दुहेरी तक्रारींमुळे नागापूर परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी गावात चोख बंदोबस्त ठेवला आहे.

