drought-affected : मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव नुकसानभरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघ, अकोला महानगर शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना उपनिवासी उपजिल्हाधिकारी, अकोला यांच्यामार्फत सादर करण्यात आले.

अण्णासाहेब पाटील मंडळाच्या कर्जातील अडचणी दूर करा; मराठा महासंघाचा सरकारला आंदोलनाचा इशारा
अकोला : मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव नुकसानभरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघ, अकोला महानगर शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना उपनिवासी उपजिल्हाधिकारी, अकोला यांच्यामार्फत सादर करण्यात आले.
पावसाअभावी महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना किती आणि कोणत्या स्वरूपात नुकसानभरपाई देण्यात येणार, याबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याचे मराठा महासंघाने निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांना तातडीने आर्थिक दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शासनाने दुष्काळ जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बँकांकडून ७/१२ उतारा जोडून वाहन, शेती तसेच इतर उद्योगांसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी वाहन व इतर उद्योगांसाठी कर्ज मिळावे म्हणून सादर केलेले अर्ज तातडीने मंजूर करण्यात यावेत. कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत बँकांकडून होणारा त्रास थांबविण्यात यावा आणि पात्र लाभार्थ्यांना सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच शेतमजुरांसाठी तातडीने रोजगारनिर्मितीची कामे सुरू करण्यात यावीत, अशी मागणी मराठा महासंघाने केली आहे. या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन सादर करताना अकोला महानगर अध्यक्ष मुरलीभाऊ सटाले, अकोला जिल्हा उपाध्यक्ष सतीश सुर्वे, महिला जिल्हाध्यक्ष सुनीताताई ताथोड, युवक कार्याध्यक्ष आदेश अंधारे, मराठा सेवा संघाचे अशोकराव पटोकार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राम मुळे, विठ्ठल गाढे, एड. प्रवीण महल्ले, डॉ. तेजराव नराजे, अमित देशमुख, अशोकराव पाथ्रीकर, दिलीपराव देशमुख, भुजंगराव देशमुख, प्रा. रामराव बाजड, विनायकराव गायकवाड, अजय कस्तुरकर, नंदकिशोर गावंडे, संतोष वक्ते, राजेश दांडेकर, श्याम वाघेले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

