Mahabreaking

[breaking_news]

drought-affected: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; फरहान अमीन यांच्या मागणीला यश

drought-affected: पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रा. मो. फरहान अमीन यांनी शासनाकडे केली होती. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागांसाठी जाहीर केलेल्या मदत उपाययोजनांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काबाबत सवलतीचा निर्णय घेतल्याने फरहान अमीन यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

drought-affected

  दुष्काळाचा विद्यार्थ्यांनाही दिलासा; परीक्षा शुल्कमाफीच्या मागणीला शासनाची मंजुरी

निशांत गवई

पातूर : पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रा. मो. फरहान अमीन यांनी शासनाकडे केली होती. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागांसाठी जाहीर केलेल्या मदत उपाययोजनांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काबाबत सवलतीचा निर्णय घेतल्याने फरहान अमीन यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना दुष्काळाच्या आर्थिक संकटाचा फटका बसू नये आणि केवळ आर्थिक अडचणीमुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, या उद्देशाने फरहान अमीन यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले होते. त्यामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती.

राज्य शासनाने २०२६ च्या खरीप हंगामातील पावसाच्या तुटीच्या पार्श्वभूमीवर २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करून विविध सवलती व मदत उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कासंदर्भातील सवलतीचाही समावेश आहे.

या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळण्यास मदत होणार असून, शिक्षणाच्या खर्चामुळे निर्माण होणारा अतिरिक्त आर्थिक भार कमी होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे फरहान अमीन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, परीक्षा शुल्कमाफीसोबतच प्रभावित विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि वसतिगृह शुल्कातही विशेष सवलत देण्यात यावी, अशी मागणी फरहान अमीन यांनी केली आहे. दुष्काळाच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने विद्यार्थीकेंद्रित आणखी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

फरहान अमीन म्हणतात…

“पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्याची मागणी शासनाने मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार.

शेतकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना दिलासा देणारा हा निर्णय स्वागतार्ह आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक संकटाचा फटका बसू नये, यासाठी शासनाने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे.”

विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणखी सवलती द्या

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र, आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि वसतिगृह शुल्कातही विशेष सवलत देण्यात यावी. दुष्काळामुळे शेतकरी कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ नये, यासाठी शासनाने पुढील उपाययोजना कराव्यात.

— प्रा. मो. फरहान अमीन

प्रदेश सचिव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top