Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Buddhist thought: बुद्ध विचार हा मानव प्रगतीचा मार्ग-भंते विनय रक्खिता महाथेरो

Buddhist thought: आज संपूर्ण मानव जात ही धकाधकीच्या जीवनामध्ये दुःखात हुरपळून जात आहे. त्यामुळे व्यसनाधीनता, चोरी हत्या यासारख्या गोष्टी या वारंवार घडताना दिसत आहे. मानवाच्या अस्वस्थतेसाठी त्याचे मन स्वस्त करण्यासाठी भगवान बुद्धांनी त्रिपिटकामध्ये दिलेला उपदेश हा विचार मानव प्रगतीचा मार्ग आहे असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय त्रिपिटीका सांगायनाचे जनरल सेक्रेटरी भंते विनय रक्खिता महाथेरो यांनी केले.

Buddhist thought

बुलढाणा शहरात ऐतिहासिक त्रिपिटक संमेलन संपन्न

बुलढाणा : आज संपूर्ण मानव जात ही धकाधकीच्या जीवनामध्ये दुःखात हुरपळून जात आहे. त्यामुळे व्यसनाधीनता, चोरी हत्या यासारख्या गोष्टी या वारंवार घडताना दिसत आहे. मानवाच्या अस्वस्थतेसाठी त्याचे मन स्वस्त करण्यासाठी भगवान बुद्धांनी त्रिपिटकामध्ये दिलेला उपदेश हा विचार मानव प्रगतीचा मार्ग आहे असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय त्रिपिटीका सांगायनाचे जनरल सेक्रेटरी भंते विनय रक्खिता महाथेरो यांनी केले.
इंटरनॅशनल त्रिपीठका चॅटिंग कौन्सिल भारत यांच्या वतीने आयोजित विसाव्या आंतरराष्ट्रीय त्रिपिठक संघायनाच्या कार्यक्रमाच्या आयोजन अंतर्गत दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट बुलढाणा च्या वतीने रविवार दि. 9 नोव्हेंबर 2025 रोजी राधा गोविंद सेलिब्रेशन हॉल बुलढाणा येथे त्रिपीटक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
या कार्यक्रमास धम्मदेशना देण्यासाठी भंते ज्ञानबोधि महाथेरो, भंते करुणानंद महाथेरो, भंते ज्ञानरक्षित थेरो, भंते यश थेरो, भन्ते बी राहुलो, भंते सुजात तीसस, भंते धम्मधर, भंते अनमोल रत्न यांची उपस्थिती होती.

 त्रिपिटक म्हणजे बुद्धांची शुद्ध वाणी-बनते ज्ञानरक्षित थेरो
त्रिपिटक हा ग्रंथ सर्वात प्राचीन ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये भगवान बुद्धांनी दिलेला उपदेश हा जसा दिला तसाच आहे. त्यामुळे 2500 वर्षापासून बुद्ध वाणी शुद्ध रूपाने आजही जिवंत आहे. या वाणीचे संवर्धन करण्यासाठी आणि जनसामान्यात पोहोचवण्यासाठी त्रिपिटक सांगायनाची आवश्यकता आहे. असे मत व्यक्त केले.

आचाराविना विचार वाया आहेत-भंते करुणानंद महाथेरो
भगवान बुद्धाने धम्मपदात उपदेश केला आहे. माणूस कितीही बोलत असला तर तो धम्म अनुयायी होत नाही. परंतु जो धम्माचे एक जरी गुण अंगीकारतो तो धर्माचा खऱ्या अर्थाने धम्मधर होतो.

श्रद्धे शिवाय प्रज्ञा विकसित होत नाही – भंते यश थेरो
व्यक्ती कितीही प्रज्ञावा नसला परंतु जर त्याच्यामध्ये श्रद्धा नसेल तर तो व्यक्ती आपल्या प्रज्ञेचा वापर हा गैर कामासाठी करून इतरांची हानी करू शकतो म्हणून भगवान बुद्धांनी प्रज्ञ बरोबर श्रद्धेची आवश्यकता आहे असे सांगितले आहे.

Buddhist thought

दरवर्षी गेल्या वीस वर्षापासून महाबोधी महाविहार बोध गया येथील पवित्र बोधी वृक्षाखाली भगवान बुद्धाच्या पवित्र वाणीचे म्हणजे त्रिपिटकाचे सांगायान करण्यात येते. यावर्षी या कार्यक्रमाच्या आयोजनाचा मान हा भारतीय भिक्षूंना उपासक तथा उपासिका यांना मिळाला आहे. तब्बल 27 देशातील बौद्ध अनुयायी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या तयारी अंतर्गत बुलढाणा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेश खंडेराव यांनी केले. तर अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे यांनी कार्यक्रमाच्या आयोजना मागची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाचे मुख्य आयोजक कुणाल पैठणकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता. सुरेश डवरे, एड. राहुल दाभाडे,आत्माराम चौतमोल भिकाजी मेढे, प्रशांत बोर्डे, सुरेश घेवंदे, प्राध्यापक प्रदीप जाधव, सुरेश सरकटे, संजय जाधव, मोनिका साळवे, सारिका घेवंदे, सिद्धार्थ आराख, गणेश झोटे, पद्माकर डोंगरे, प्रल्हाद कांबळे, वैशाली अंभोरे, रीता सपकाळ, सुजाता हिवाळे, अस्मिता खंडेराव, अनुला क्षीरसागर, व उपासिका संघाच्या महिलांनी केले. या वेळेला हजारोंच्या संख्येने उपासक व उपासिका यांची उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top