Police raids at five places : बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस ठाणे हद्दीत अवैध गावठी हातभट्टी व देशी दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी एकाच दिवशी मोठी कारवाई केली. दिनांक १० नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण ७२,६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गावठी हातभट्टी व देशी दारू विक्रेत्यांवर कारवाई – ७२,६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त
राहुल सोनोने
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस ठाणे हद्दीत अवैध गावठी हातभट्टी व देशी दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी एकाच दिवशी मोठी कारवाई केली. दिनांक १० नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण ७२,६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार एपीआय पंकज कांबळे यांना हद्दीतील विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत खालील आरोपींवर धडक छापे टाकले.बबलू उर्फ धर्मेंद्र शिरसाट (रा. आगर), ऋषिकेश शिरसाट (रा. आगर), प्रवीण पाटील (रा. खंडाळा), प्रमोद चोपडे (रा. खंडाळा), स्वप्निल पाटील (रा. खंडाळा) या सर्वांवर ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत एएसआय विजयसिंह झाकर्डे, पोलीस हवालदार नेमाडे, खान, भोजने, वैदकर, पोलीस शिपाई गाढवे, जाधव, वाकोडे, नागरे तसेच महिला पोलीस शिपाई शालिनी महाद्वारे यांनी सहभाग घेतला. या धडक मोहिमेमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

