Mahabreaking

[breaking_news]

Parimal Singh :एफपीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवा; कृषी सचिव परिमल सिंह यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Parimal Singh : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत बोरगाव मंजू येथील बेरार फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वेअरहाऊस तसेच क्लिनिंग व ग्रेडिंग युनिटला महाराष्ट्र राज्याचे कृषी सचिव परिमल सिंह यांनी सदिच्छा भेट देऊन विविध उपक्रमांची पाहणी केली.

Parimal Singh

 स्मार्ट प्रकल्पाच्या कामाची कृषी सचिवांकडून पाहणी; शेतकरीहितासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शनावर भर

आगाखान पठाण

अकोला : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत बोरगाव मंजू येथील बेरार फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वेअरहाऊस तसेच क्लिनिंग व ग्रेडिंग युनिटला महाराष्ट्र राज्याचे कृषी सचिव परिमल सिंह यांनी सदिच्छा भेट देऊन विविध उपक्रमांची पाहणी केली.

प्रकल्पाची पाहणी करताना कृषी सचिव परिमल सिंह यांनी एफपीसीच्या माध्यमातून उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रकल्पाचा परिसरातील अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी यंत्रणेने योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.

यानंतर कृषी सचिवांनी प्रकल्प उभारणीच्या विविध टप्प्यांतील कामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच, त्यांच्या हस्ते प्रकल्प परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती गणेश घोरपडे, प्रकल्प संचालक आत्मा मुरलीधर इंगळे, विभागीय नोडल अधिकारी (स्मार्ट) अमरावती प्रशांत नाईक, जिल्हा कृषी अधिकारी अकोला तुषार जाधव, नोडल अधिकारी (स्मार्ट) मोहिनी जाधव, कृषी उपसंचालक हरीश देशमुख, विभागीय अंमलबजावणी कक्ष अमरावतीचे मिलिंद वानखेडे तसेच बेरार फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक संतोष वानखडे, सौ. निताताई गवई, हर्षाताई तायडे, राजेंद्र देशमुख, देवानंद गवई, प्रदीप गवई, नितेश गवई, तुषार वानखडे, बुद्धादास गवई, किशोर राजूरकर आणि वेदांत वानखडे उपस्थित होते.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top