Mahabreaking

[breaking_news]

Vijayraj Shinde :भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी पंतप्रधान मोदींचे कार्य राष्ट्रीय सेवावृत्तीचे’ — विजयराज शिंदे

Vijayraj Shinde : भारत देशाला विश्वगुरू म्हणून ओळख मिळावी, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य राष्ट्रीय सेवावृत्ती जोपासणारे असल्याचे प्रतिपादन भाजपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साखरखेर्डा येथे आयोजित कार्यक्रमात अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

Vijayraj Shinde

  कोरोना काळातील योगदानाची दखल; साखरखेर्ड्यात अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा भाजपकडून सन्मान

साखरखेर्डा  : भारत देशाला विश्वगुरू म्हणून ओळख मिळावी, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य राष्ट्रीय सेवावृत्ती जोपासणारे असल्याचे प्रतिपादन भाजपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साखरखेर्डा येथे आयोजित कार्यक्रमात अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

विजयराज शिंदे म्हणाले की, गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही प्रकारचा डाग लागू न देता पंतप्रधानपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे, असा दावा त्यांनी केला. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा गौरव करणे हा भाजपच्या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अंगणवाडी सेविकांच्या योगदानाचा गौरव

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून विविध शासकीय योजना आणि उपक्रमांची अंमलबजावणी करण्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीसांची भूमिका महत्त्वाची असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. तसेच मुलांच्या जन्मनोंदणीसह विविध शासकीय कामांमध्ये आणि बीएलओंसोबत माहिती संकलनाच्या कार्यात त्यांनी योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या कामाची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सविताताई पाटील, प्रदेश सदस्य उल्हास देशपांडे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बर्डे, निताताई देशपांडे, पूजा रिंढे, उपसरपंच अंकिताताई राजपूत, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सचिव परवेझ भाई, भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष दसरे, दीपक चिंचोले, शिवाजी वाघ, अंकुर देशपांडे, गोपाल पाझडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कवीता संग्रहाचे प्रकाशन

या कार्यक्रमात डिगांबर गाडे यांच्या ‘ओंजळ भरली मोत्याने’ या कवीता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन डिगांबर गाडे यांनी केले, तर आभार संतोष दसरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दीपक रिंढे, भाजप युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पऱ्हाड, संग्रामसिंह राजपूत, शिराळे आणि बंगाळे यांनी सहकार्य केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top