electric shock : पातूर तहसील अंतर्गत येणाऱ्या तुलंगा बु. येथे विद्युत रोहित्राच्या धक्क्याने बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे शेतकरी भीमराव सखाराम तायडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, संबंधित विभागाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वीज रोहित्राच्या धक्क्याने बैलाचा जागीच मृत्यू; शेतकऱ्याला तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी
राहुल सोनोने
वाडेगाव : पातूर तहसील अंतर्गत येणाऱ्या तुलंगा बु. येथे विद्युत रोहित्राच्या धक्क्याने बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे शेतकरी भीमराव सखाराम तायडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, संबंधित विभागाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सस्ती महावितरण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तुलंगा बु. गावातील मुख्य मार्गावर विद्युत रोहित्र आहे. शेतकरी भीमराव तायडे हे बैल चरण्यासाठी घेऊन जात असताना बैलाचा विद्युत रोहित्राला स्पर्श झाला. त्यावेळी विजेचा धक्का लागल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत अंदाजे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.
महसूल विभागाकडून पंचनामा
घटनेची माहिती मिळताच महावितरण कार्यालयाचे शाखा अभियंता निकुंभ आणि वीज वितरण कर्मचारी विकी उपर्वट यांनी घटनास्थळी भेट दिली. तहसीलदार राहुल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल अधिकारी तिडके यांनी घटनेचा पंचनामा करून अहवाल पाठविला आहे.
दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज घावट यांनी घटनास्थळी जाऊन मृत बैलाचे शवविच्छेदन केले. संबंधित विभागांकडून घटनेची नोंद घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
नुकसानभरपाई देण्याची मागणी
विद्युत रोहित्राच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकरी भीमराव तायडे यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे महावितरण किंवा संबंधित विभागाने प्रकरणाची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्याला योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्य मार्गावर असलेल्या विद्युत रोहित्रामुळे भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी संबंधित विभागाने विद्युत सुरक्षेची तपासणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.या घटनेचा पुढील तपास चान्नी पोलिस करीत आहेत.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

