Mahabreaking

[breaking_news]

Restructuring :भारतीय बौद्ध महासभा बुलडाणा तालुका समितीचे २० सप्टेंबरला पुनर्गठन

Restructuring : भारतीय बौद्ध महासभा, बुलडाणा तालुका समितीच्या पुनर्गठनासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक रविवार, २० सप्टेंबर २०२६ रोजी बुलडाणा येथील विश्राम भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.

Restructuring

  बुलडाणा तालुका अध्यक्षपदाची होणार निवड; बौद्ध बांधवांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन

बुलडाणा   : भारतीय बौद्ध महासभा, बुलडाणा तालुका समितीच्या पुनर्गठनासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक रविवार, २० सप्टेंबर २०२६ रोजी बुलडाणा येथील विश्राम भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीदरम्यान भारतीय बौद्ध महासभेच्या बुलडाणा तालुका अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. तसेच तालुका समितीच्या पुनर्गठनाच्या अनुषंगाने संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात येणार आहे.

तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेच्या कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी या बैठकीला विशेष महत्त्व असल्याने बुलडाणा तालुक्यातील बहुसंख्य बौद्ध बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष पी. बी. इंगोले व संघटक हरीभाऊ मोरे यांनी केले आहे.

तालुका समितीच्या पुनर्गठन प्रक्रियेत बौद्ध बांधवांनी सक्रिय सहभाग नोंदवून बैठकीला वेळेत उपस्थित राहावे, असेही आयोजकांनी कळविले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top