Mahabreaking

[breaking_news]

revolver to disperse :गाडी पार्क करण्यावरून वाद; गर्दी पांगवण्यासाठी रिव्हॉल्व्हरमधून हवेत झाडली गोळी  

revolver to disperse : गाडी उभी करण्याच्या कारणावरून लोकांनी वाद निर्माण केल्यानंतर गर्दी पांगवण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून हवेत एक गोळी झाडल्याचा प्रकार कानशिवणी येथील मुख्य चौकात १६ सप्टेंबर बुधवार रोजी रात्री आठ वाजता दरम्यान घडला. हवेत गोळी झाडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

revolver to disperse

कानशिवणीत पार्किंगच्या कारणावरून तणाव; अंगरक्षकासह पोलीस ठाण्यात पोहोचला रिव्हॉल्व्हरधारी

बोरगाव मंजू : गाडी उभी करण्याच्या कारणावरून लोकांनी वाद निर्माण केल्यानंतर गर्दी पांगवण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून हवेत एक गोळी झाडल्याचा प्रकार कानशिवणी येथील मुख्य चौकात १६ सप्टेंबर बुधवार रोजी रात्री आठ वाजता दरम्यान घडला. हवेत गोळी झाडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण  हुंडीवाले   बुधवार रोजी रात्री 7 ते 8 वाजताच्या दरम्यान कानशिवणी येथील गजानन महाराज चौकात आले होते. गाडी उभी करण्याच्या कारणावरून त्याठिकाणी काही नागरिक जमा झाले. त्यांच्यात आणि हुंडीवाले यांच्यात वादाची परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जाते. जमलेले लोक अरेरावी करीत अंगावर येत असल्याने भीतीच्या परिस्थितीत गर्दी पांगवण्यासाठी हुंडीवाले यांनी त्यांच्याकडे असलेल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून हवेत एक गोळी झाडल्याचे पोलिसांना देण्यात आलेल्या माहितीत नमूद आहे.

यावेळी त्यांच्यासोबत एक अंगरक्षक सुध्दा होता,हवेत एक गोळी झाडल्याने  जमलेली गर्दी तेथून निघून गेली. त्यानंतर प्रवीण हुंडीवाले हे त्यांच्या अंगरक्षकासह बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात

प्रवीण हुंडीवाले यांनी गर्दीची भीती वाटत असल्याने गर्दी पांगवण्यासाठी त्यांनी हवेत एक गोळी झाडल्याचा  त्यांच्या अंगरक्षकाने पोलीस ठाण्यात अर्ज दिला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी वैशालीताई मुळे, स्थानिक शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन लेव्हनकर , ठाणेदार सुनील वानखडे , स्थानिक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, स्वप्नील खेडकर,वसिम, किशोर सोनवणे यांच्या सह पोलिसांनी  घटनास्थळी रवाना झाले आणि परिस्थितीची पाहणी केली.

पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित नागरिकांशी चर्चा करून त्यांना शांत केले. तसेच काही सांगायचे असल्यास पोलीस ठाण्यात येऊन माहिती देण्याच्या सूचना केल्या.

परिसरात पोलिसांचा बंदोबस्त

घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात असून, सध्या घटनास्थळी शांतता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. त्यामुळे परिसरातील परिस्थितीवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन नेमकी हवेत गोळी का झाडली या दृष्टिकोनातून ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी तपास सुरू केला आहे,

अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे कानशिवणीतील या प्रकाराच्या पुढील तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top