Kids Paradise: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय ज्युडो स्पर्धेत पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या सात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. विशेष म्हणजे, हे सातही विद्यार्थी आगामी विभागीय ज्युडो स्पर्धेत अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

पातूरच्या किड्स पॅराडाईजची दमदार कामगिरी; सात विद्यार्थ्यांची विभागीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड
निशांत गवई
पातूर : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय ज्युडो स्पर्धेत पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या सात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. विशेष म्हणजे, हे सातही विद्यार्थी आगामी विभागीय ज्युडो स्पर्धेत अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील शालेय क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली असून, नुकतीच १४ व १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धा अकोला येथील वसंत देसाई स्टेडियमवर उत्साहात पार पडली. जिल्हाभरातून शेकडो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेत किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विभागीय स्तरावर धडक मारली. विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अर्पित माहोकर, आनंद उगले, पूर्वेश भराडी, सक्षम वैराळे, यश महल्ले, लावण्या गाडगे आणि अनुष्का भगत यांचा समावेश आहे.
या सातही विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेत कौतुक व अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांसह त्यांचे क्रीडा शिक्षक अक्षय तायडे यांचा शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे आणि सचिव सौ. ज्योत्स्ना गाडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शुभांगी बोरकर यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन आणि परिश्रम महत्त्वाचे ठरले. या यशाबद्दल मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नीतू ढोणे, नरेंद्र बोरकर, प्रियंका चव्हाण, बजरंग भुजबळराव, स्वप्निल पाटील, अविनाश पाटील, शुभांगी बोरकर, स्मितल उगले, वैशाली इंगळे, अक्षय तायडे, सदानंद कातखेडे, हरिष सौंदळे, तेजस्विनी गवई, समीक्षा डोंगे, मानसी दाते, कल्पना वानेरे आणि रोशनी नकाशे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

