Mahabreaking

🔴 BREAKING
Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक

 girl’s body: मोकाट कुत्र्यांनी उकरून काढला बालिकेचा मृतदेह; मेहकर हादरलं!

girl’s body:  शहरातील जानेफळ रोड परिसरात शुक्रवार सकाळी एक हृदयद्रावक प्रकार समोर आला. आजारपणामुळे मृत झालेल्या दीड वर्षांच्या बालिकेचा मृतदेह अंत्यविधीनंतर मोकाट कुत्र्यांनी उकरून बाहेर काढल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात दुःख आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

girl's body

जानेफळ रोडवरील हृदयद्रावक घटना; पोलिसांची तत्काळ पाहणी, नागरिकांत हळहळ
मेहकर :शहरातील जानेफळ रोड परिसरात शुक्रवार सकाळी एक हृदयद्रावक प्रकार समोर आला. आजारपणामुळे मृत झालेल्या दीड वर्षांच्या बालिकेचा मृतदेह अंत्यविधीनंतर मोकाट कुत्र्यांनी उकरून बाहेर काढल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात दुःख आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जानेफळ रोडवरील महानुभाव पंथ मंदिराजवळील मोकळ्या जागेत काही कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यापैकी एका फिरस्ती कुटुंबातील बालिकेचा काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे मृत्यू झाला होता. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पालकांनी पारंपरिक पद्धतीने जवळच बालिकेचा दफनविधी केला होता. मात्र खोदलेला खड्डा पुरेसा खोल नसल्याने मोकाट कुत्र्यांनी तो उकरून मृतदेह बाहेर काढला आणि त्याचे लचके तोडले.

शुक्रवारी सकाळी नागरिकांनी मंदिराजवळ रस्त्यावर मानवी अवयवांचे तुकडे पडलेले पाहून पोलिसांना माहिती दिली. तत्काळ मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. चौकशीत बालिकेचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचे पालकांनी कबूल केले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला असून, पालकांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे, ठाणेदार व्यंकटेश आलेवार आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. या हृदयद्रावक घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top