Rain has been absent: बार्शीटाकळी तालुक्यासह एरंडा परिसरात गत दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पावसाअभावी पिके करपण्यास सुरुवात झाली असून, संपूर्ण खरीप हंगाम हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत व आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी एरंडा येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

कर्ज काढून पेरणी, पावसाच्या खंडाने पिके उद्ध्वस्त; तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
विझोरा : बार्शीटाकळी तालुक्यासह एरंडा परिसरात गत दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पावसाअभावी पिके करपण्यास सुरुवात झाली असून, संपूर्ण खरीप हंगाम हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत व आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी एरंडा येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
यासंदर्भात शेतकऱ्यांनी ९ सप्टेंबर रोजी बार्शीटाकळी तहसीलदारांना निवेदन सादर केले. तालुक्यात सुरुवातीपासूनच अत्यल्प पाऊस झाला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कर्ज तसेच व्याजाने पैसे घेऊन खरीप पिकांची पेरणी केली. सुरुवातीला झालेल्या एक-दोन पावसाच्या आधारावर पिकांनी तग धरला; मात्र त्यानंतर तब्बल दीड महिन्यांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने पिकांची अवस्था गंभीर झाली आहे.
पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतातील पिके अक्षरशः करपली असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पेरणीपासून आतापर्यंत केलेला खर्च, कर्जाचा बोजा आणि त्यातच उत्पादनाची आशा मावळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतमजुरांनाही रोजगार उपलब्ध होत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर या दोन्ही घटकांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शासनाने परिस्थितीची तातडीने पाहणी करून बार्शीटाकळी तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर भारत निकोशे, सुरेश शिंदे, संदीप शर्मा, प्रकाश शिंदे, संतोष काकड, सचिन आमले, प्रमोद तायडे, मनोज चराटे, अंबादास खिरेकार, रामदास फाटकर, गजानन बघे, मोहन आमले, डिंगाबर भोंगरे, वासुदेव पवार यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

