A car collided : समृद्धी महामार्गावरील डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई कॉरिडॉरवर अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ५.१० वाजेच्या सुमारास चैनल क्रमांक २६३ येथे घडला.

समृद्धीवर पहाटे भीषण अपघात; राजकोटच्या तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
मेहकर : समृद्धी महामार्गावरील डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई कॉरिडॉरवर अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ५.१० वाजेच्या सुमारास चैनल क्रमांक २६३ येथे घडला.
अपघाताची माहिती पहाटे ५.१५ वाजता सीआरओ, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून दूरध्वनीद्वारे समृद्धी महामार्ग उपकेंद्राला देण्यात आली. माहिती मिळताच उपकेंद्रातील पोलीस अधिकारी व अंमलदार घटनास्थळी रवाना झाले. यावेळी HC 2104, 71, 1962, 523, चालक PC 2611 तसेच MSFचे दोन जवान घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, स्कोडा स्लाव्हिया कंपनीची कॅंडी व्हाइट रंगाची कार (क्र. GJ03PD9004) नागपूरहून मुंबईच्या दिशेने मुंबई कॉरिडॉरवरून जात होती. दरम्यान, कारने पुढे जात असलेल्या अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरवर जाऊन आदळल्याने अपघात झाला.
या अपघातात कारचालक हिरेन रमेशभाई सिद्धपुरी (रा. राजकोट, गुजरात) यांचा मृत्यू झाला. तर तुषार मकवाना आणि वीरेन सिद्धपुरी हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करण्यात आले असून घटनास्थळी योग्य बॅरिकेडिंग करण्यात आले. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुढील कार्यवाही सुरू आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

