Mahabreaking

🔴 BREAKING
Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक

Municipal Council elections: नगरपरिषद निवडणुकीसाठी सूक्ष्म नियोजन करा : जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

Municipal Council elections: जिल्ह्यातील 11 नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी निवडणूक पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करुन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले.

Municipal Council elections
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा

बुलढाणा : जिल्ह्यातील 11 नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी निवडणूक पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करुन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले.
या आढावा बैठकीला अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार, जिल्हा सह आयुक्त पेंटे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी आदर्श आचारसंहिता, प्रतिबंधात्मक आदेश, मनुष्यबळाचे व्यवस्थापन, मतदान आणि मतमोजणी विषयक तयारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, विविध भरारी पथकांच्या नियुक्त्या, मतदान केंद्रांवरील सोयीसुविधा, बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट वाटपाचे व्यवस्थापन, मतमोजणी केंद्रावरील सोयीसुविधा, कायदा व सुव्यवस्था, विविध समित्यांच्या नेमणुका आदी विषयांचा आढावा घेवून सविस्तर चर्चा करण्यात आली.
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने यंत्रणा सज्ज ठेवावे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रतिबंधात्मक आदेश जारी करावे. मतदान केंद्रांवरील सोयीसुविधांची खात्री करावी. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्या. प्रचाराला सुरुवात होण्यापूर्वी विविध भरारी पथके कार्यान्वित करावी. नियंत्रण कक्ष स्थापन करुन मतदारांसाठी मदत क्रमांक जारी करावे. नगरपरिषद निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी या बैठकीत दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top