Celebrating : येथील महिलांच्या पुढाकारातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती सोमवारी, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

कारेगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना अभिवादन; महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती
भागवत चव्हाण
कारेगाव : येथील महिलांच्या पुढाकारातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती सोमवारी, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारेगाव नगरीच्या सरपंच सौ. नर्मदा विश्वनाथ केंधळे होत्या, तर कौशल्याबाई येवले या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ. सुनिता नंदकुमार गायकवाड, सौ. सपना नारायण बोखारे, सौ. जिजाबाई मोतीराम गायकवाड यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी सौ. सुनिता गायकवाड यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. अण्णाभाऊंचा संघर्षमय जीवनप्रवास, साहित्यिक कार्य तसेच समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी त्यांनी केलेले योगदान याविषयी त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.
दीपाली वानखेडे यांनीही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचा जागर केला. त्यांच्या प्रभावी मनोगतामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाला गावातील महिला व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यामध्ये रखमाबाई गायकवाड, कमलबाई गायकवाड, रंजना गायकवाड, सुमनबाई गायकवाड, शारदाबाई गायकवाड, अहिल्याबाई पारधे, अनुराधा पारधे, उज्वला पारधे, शोभाबाई गायकवाड, ज्योती गायकवाड, सुनीताबाई बाजड, शोभाबाई बाजड, कौशल्याबाई वानखेडे, शकुंतला वानखेडे, मालतीबाई वानखेडे, मंगलबाई वानखेडे, कविता वानखेडे, बेबाबाई पंडागळे, यशोदा वानखेडे, गंगासागर गायकवाड, कलाबाई गायकवाड, चंद्रभागा गायकवाड, अनिता बाजड, लक्ष्मी गायकवाड, बालाबाई घोडे, नर्मदा शिंदे आदी महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश गायकवाड व सुनील गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. कारेगाव येथील महिलांनी एकत्र येऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

