Mahabreaking

[breaking_news]

NCMC card :महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रवासात NCMC कार्ड अनिवार्य; १ सप्टेंबरपासून नवा नियम

NCMC card : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महिला व ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, दि. १ सप्टेंबर २०२६ पासून सवलतीच्या प्रवासासाठी NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) अनिवार्य करण्यात आले आहे. या तारखेपासून महिला व ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांना सवलतीचे तिकीट केवळ NCMC कार्डद्वारेच देण्यात येणार असल्याने प्रवाशांनी कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

.NCMC card

  सवलतीचे एसटी तिकीट आता NCMC कार्डवरूनच; महामंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

संजय तायडे

बोरगाव मंजू : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महिला व ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, दि. १ सप्टेंबर २०२६ पासून सवलतीच्या प्रवासासाठी NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) अनिवार्य करण्यात आले आहे. या तारखेपासून महिला व ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांना सवलतीचे तिकीट केवळ NCMC कार्डद्वारेच देण्यात येणार असल्याने प्रवाशांनी कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यासंदर्भात महाव्यवस्थापक (वाहतूक) यांच्या वतीने राज्यातील सर्व प्रादेशिक व्यवस्थापक, सनियंत्रण समित्या तसेच विभाग नियंत्रकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ व बुलढाणा या विभागांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रा.प. महामंडळाकडून शासनाच्या निर्देशानुसार विविध सामाजिक घटकांतील सवलतधारक तसेच विनासवलतधारक प्रवाशांना NCMC कार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कार्डाच्या नोंदणी व वितरणासाठी मे. ईबिक्स टेक्नॉलॉजिस लि. यांच्यामार्फत एसटी आगार, बसस्थानके तसेच आगाराच्या हद्दीबाहेर अधिकृत एजंटांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांचे NCMC कार्ड नोंदणी व वितरणाचे काम सुरू आहे. त्याचबरोबर टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारक प्रवाशांनाही NCMC कार्ड उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

महामंडळाच्या आदेशानुसार, दि. १ सप्टेंबर २०२६ पासून ज्येष्ठ नागरिक व महिला लाभार्थ्यांना सवलतीचे तिकीट NCMC कार्डमधूनच वितरित करण्यात येणार आहे. तसेच एसटी वाहकांना या कार्डचे टॉप-अप करण्याची जबाबदारीही देण्यात आली आहे. याबाबतची मानक कार्यप्रणाली अर्थात एसओपी यापूर्वी संबंधित विभागांना पाठविण्यात आली असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभाग नियंत्रकांनी आपल्या अखत्यारितील आगार व्यवस्थापकांना याबाबत माहिती द्यावी. तसेच आगारातील चालक, वाहक आणि संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन प्रवाशांना कोणतीही अडचण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीच्या प्रवासात NCMC कार्ड प्रणाली लागू झाल्याने एसटीच्या तिकीट वितरण व्यवस्थेत डिजिटल पद्धतीचा अधिक वापर होणार असून, दि. १ सप्टेंबरपासून या नव्या व्यवस्थेची राज्यभरात अंमलबजावणी होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top