Mahabreaking

[breaking_news]

Father assaulted :मुलीला भेटण्यासाठी गेलेल्या पित्याला मारहाण; भावजयीला जीवे मारण्याची धमकी

Father assaulted : पत्नी व मुलीला भेटण्यासाठी गारगुंडी येथे गेलेल्या व्यक्तीस अश्लील शिवीगाळ करून चापटांनी मारहाण केल्याचा, तसेच मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या त्याच्या भावजयीला धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Father assaulted
‘मुलीला पुण्याला पाठवले’ म्हणत वाद; जावयाला शिवीगाळ व चापटांचा मार

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : पत्नी व मुलीला भेटण्यासाठी गारगुंडी येथे गेलेल्या व्यक्तीस अश्लील शिवीगाळ करून चापटांनी मारहाण केल्याचा, तसेच मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या त्याच्या भावजयीला धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश नारायण इलग (वय ३९, रा. सोयंदेव, ता. सिंदखेडराजा) यांची पत्नी पूजा ही मागील सुमारे १४ महिन्यांपासून त्यांची मुलगी अपुर्वा हिच्यासह गारगुंडी येथे आरोपींच्या घरी राहण्यास आली आहे. त्यानंतर फिर्यादी व आरोपींमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
२६ ऑगस्ट रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास गणेश इलग हे पत्नी पूजा व मुलगी अपुर्वा हिला भेटण्यासाठी गारगुंडी येथे गेले होते. त्यावेळी आरोपी सुधीर भानुदास काकड याने फिर्यादीला त्याच्या पत्नीचे दुसरे लग्न लावून दिल्याचे तसेच मुलगी अपुर्वा हिला तिचा मामा विशाल याच्याकडे पुणे येथे राहण्यास पाठविल्याचे सांगितले.
मुलीला भेटण्याची इच्छा व्यक्त करून तिची भेट घडवून देण्याची विनंती फिर्यादीने केली. यावरून वाद वाढला. आरोपानुसार, सुधीर काकड याने फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करून तोंडावर चापटांनी मारहाण केली.
यावेळी फिर्यादीची भावजय वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यास आली. मात्र, आरोपी राधाबाई भानुदास काकड यांनी तिला धक्काबुक्की करून ‘तुम्हाला एखाद्या दिवशी जीवे मारून टाकू’, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेनंतर गणेश इलग यांनी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तोंडी तक्रार दिली. त्यावरून सुधीर भानुदास काकड व राधाबाई भानुदास काकड, दोघेही रा. गारगुंडी, यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २९६, ११५(२), ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलिस हेड कॉन्स्टेबल सय्यद मुसा (ब.नं. ६४७) यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे (ब.नं. १२०२) करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top