Sant Shukdas Maharaj’s: विवेकानंद आश्रमातून दरवर्षी कार्तिक पौर्णिमेनिमित्त संत शुकदास महाराजांची रथयात्रा काढली जाते. याही वर्षी विवेकानंद आश्रम ते आदिवासींचे तीर्थक्षेत्र ब्रह्मतीर्थ, भौरद येथे जाणाऱ्या या भव्य शोभायात्रेचे मार्गावरील विविध ठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले.

विवेकानंद आश्रम ते भौरद ब्रह्मतीर्थपर्यंत शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत
डोणगाव : विवेकानंद आश्रमातून दरवर्षी कार्तिक पौर्णिमेनिमित्त संत शुकदास महाराजांची रथयात्रा काढली जाते. याही वर्षी विवेकानंद आश्रम ते आदिवासींचे तीर्थक्षेत्र ब्रह्मतीर्थ, भौरद येथे जाणाऱ्या या भव्य शोभायात्रेचे मार्गावरील विविध ठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले.
डोणगाव येथे रथयात्रेचे आगमन होताच संत गजानन महाराज उत्सव समितीतर्फे डॉ. गजानन उल्हामाले, गावातील प्रतिष्ठित नागरिक व पत्रकारांनी रथयात्रेचे स्वागत केले. बाळासाहेब आखाडे व सहकाऱ्यांनी मॉ. जानकी हॉटेल येथे चहापाणीची व्यवस्था करून रथयात्रेचे पूजन केले.
बसस्थानकावर आगमन होताच सुरेश फिसके मित्र मंडळातर्फे रथयात्रेचे स्वागत करून संत शुकदास महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मान्यवरांनी अभिवादन करत यात्रेकरूंसाठी चहापाणीची व्यवस्था केली.तसेच माजी कृषी सभापती राजेंद्र पळसकर यांच्या वतीने संपर्क कार्यालयात रथयात्रेचे स्वागत करण्यात आले.
यावेळी सुरेश फिसके, भाजप तालुका अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर अजगर, हितेश सदावर्ते, सचिन गाभणे, अबरार खान, सोहेल खान, गणेश पळसकर, हेमराज शर्मा, हमीद मुल्लाजी, रामेश्वर पळसकर, गणेश लहाने, सुबोध आखाडे आदींसह विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, जनसंपर्क प्रमुख पंढरीनाथ शेळके, गजानन शास्त्री, शिवदास सांबापुरे, तसेच डोणगाव पोलीस स्टेशनचे एएसआय मंगेश खडसे, हर्ष सहगल व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

