Mahabreaking

🔴 BREAKING
Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले

pistols seized: दोन देशी कट्ट्यांसह चार जिवंत काडतुस जप्त

pistols seized: तामगाव पोलीस ठाणे हद्दीत एका आरोपी कडून दोन देशी कट्टयांसह चार जिवंत काडतुस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी तालुक्यातील ग्राम वरवट बकाल येथे काकनवाडा रस्त्यावर करण्यात आली. पोलिसांनी नांदेड येथील आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
pistols seized
नांदेड येथील एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
संग्रामपूरः तामगाव पोलीस ठाणे हद्दीत एका आरोपी कडून दोन देशी कट्टयांसह चार जिवंत काडतुस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी तालुक्यातील ग्राम वरवट बकाल येथे काकनवाडा रस्त्यावर करण्यात आली. पोलिसांनी नांदेड येथील आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला नांदेड येथील आरोपीकडून संग्रामपूर तालुक्यात देशी कट्टयांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, एजाज खान, अमोल शेजोळे, अजीस परसुवाले, शिवानंद हेलगे यांनी तामगाव पोलीस ठाणे हद्दीतील वरवट बकाल येथे सापळा
रचून काकनवाडा रस्त्यावर नांदेड येथील पवन वासुदेव कोकाटे या आरोपीकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल व चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे. आरोपीकडून एकुण ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात कलम ३,२५ शस्त्र अधिनियम सहकलम १२३, १३५ मपोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सोनाळा पोलिसांनी २७ ऑक्टोबरला मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात अग्नी शस्त्रांची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना रंगेहात पकडले होते. मध्यप्रदेशातील (चांदामेठा ता. परासिया, जिल्हा छिंदवाडा) येथील दोन्ही आरोपींकडून ५ स्टील देशी बनावटीच्या कट्ट्यांसह स्टिल मॅगझिन, १६ जिवंत काडतुसे, दोन अतिरिक्त स्टील मॅगझिन असा एकुण ७ लक्ष ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यानंतर ही दुसरी कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top