Mahabreaking

[breaking_news]

Students pick : पोलिस-आर्मी भरतीच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी हातात घेतली कुदळ; श्रमदानातून रनिंग ट्रॅक तयार

Students pick : पोलिस तसेच आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना सुरक्षितपणे धावण्याचा सराव करता यावा, यासाठी साखरखेर्डा येथील विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद पुढाकार घेतला आहे. रस्त्यावर धावताना अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन गावातील तसेच बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी हातात कुदळ-फावडे घेत मैदानाची स्वच्छता केली आणि श्रमदानातून रनिंग ट्रॅक तयार केला.

Students pick

  ‘मैदान वाचवा, तरुणांचे भविष्य घडवा’; साखरखेर्ड्यात विद्यार्थ्यांचा प्रशासनाला जागे करणारा उपक्रम

सिंदखेडराजा: पोलिस तसेच आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना सुरक्षितपणे धावण्याचा सराव करता यावा, यासाठी साखरखेर्डा येथील विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद पुढाकार घेतला आहे. रस्त्यावर धावताना अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन गावातील तसेच बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी हातात कुदळ-फावडे घेत मैदानाची स्वच्छता केली आणि श्रमदानातून रनिंग ट्रॅक तयार केला.

साखरखेर्डा येथील गट क्रमांक ८७० आणि ८४३ मधील क्रीडांगणावर विद्यार्थ्यांनी एकत्र येत श्रमदान केले. मैदानावर विखुरलेले दगड-गोटे स्वतःच्या हाताने बाजूला काढून धावण्याच्या सरावासाठी मैदान तयार करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे क्रीडांगण पुन्हा तरुणांच्या सरावासाठी सज्ज होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे.

मैदानाचा वापर बदलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप

विशेष म्हणजे, याच क्रीडांगणावर यापूर्वी नांगर फिरवून मैदानाचा वापर बदलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. मात्र, क्रीडांगणाचा वापर कायम राहावा आणि पोलिस व सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना सुरक्षित सरावाची सुविधा मिळावी, यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेत मैदानाची साफसफाई केली.

रस्त्यावरची ‘रनिंग’ नको; मैदानातच सुरक्षित सराव हवा!

पोलिस आणि सैन्य भरतीच्या तयारीत धावण्याचा सराव अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्याने धावताना अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गावातील तसेच बाहेरगावाहून सरावासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित क्रीडांगण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

याच उद्देशाने विद्यार्थ्यांनी श्रमदानातून मैदान तयार करण्याचा निर्णय घेतला. ‘खेळाचे मैदान वाचवा, तरुणांचे भविष्य घडवा’ असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.

महसूल विभागाने मैदानाच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी

विद्यार्थ्यांनी स्वतः श्रमदान करून मैदान विकसित करण्याचा प्रयत्न केला असताना संबंधित प्रशासनानेही या क्रीडांगणाची पाहणी करून त्याचे संरक्षण करावे, अशी मागणी होत आहे. मैदानाचा वापर अन्य कारणांसाठी होऊ नये, तसेच भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित सरावासाठी सुरक्षित जागा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

या श्रमदान उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते श्याम खरात, विशाल गवई, सुधीर ठाकूर, संदीप मगर, सागर मगर, अंकुर देशपांडे यांच्यासह गावातील आणि बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top