TET exam: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ चे आयोजन २३ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी अकोला शहरातील एकूण २० परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत

अकोला : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ चे आयोजन २३ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी अकोला शहरातील एकूण २० परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
पेपर 1 : सकाळी १०.३० ते दुपारी १.०० तर पेपर 2 : दुपारी २.३० ते सायं. ५.०० या वेळेत होणार आहे. पेपर १ साठी १४ केंद्रांवर ४२०० तर पेपर २ साठी २० केंद्रांवर ५५९४ असे एकूण ९७९४ परीक्षार्थी देणार आहेत. यापैकी १५९ दिव्यांग परीक्षार्थींसाठी नियमांनुसार अनुग्रह कालावधी उपलब्ध राहणार आहे. ओळखपत्र व प्रवेशपत्र सोबत ठेवणे सर्व परीक्षार्थींसाठी अनिवार्य आहे.
उच्चस्तरीय परीक्षा व्यवस्था
MAHATET परीक्षेच्या सुयोग्य आयोजनासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तर परीक्षा आयोजन व सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचे उपाध्यक्ष : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला, सदस्य सचिव : शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
तसेच शिक्षणाधिकारी (प्राथ.) कार्यालयात सनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.
परीक्षेसाठी कर्मचारी नियुक्त
या परीक्षेसाठी १ जिल्हा परिरक्षक, ५ झोनल अधिकारी, २० सहायक परिरक्षक, २० केंद्रसंचालक,५२ पर्यवेक्षक
२४१ समवेक्षक आदी नियुक्त करण्यात आले आहेत.
कडक सुरक्षा आणि तांत्रिक नियंत्रण
पेपर फुटी व डमी उमेदवारांना आळा घालण्यासाठी यंदाची परीक्षा सर्वाधिक सुरक्षित पद्धतीने घेण्यात येणार आहे.बायोमेट्रिक तपासणी, फेस स्कॅनिंग, मेटल डिटेक्टर तपासणी, LIVE AI आधारित CCTV निगराणी प्रत्येक वर्गखोलीत
“फोटो व्ह्यू” प्रणालीद्वारे ओळख पडताळणी, “कनेक्ट व्ह्यू” तंत्रज्ञानामुळे सर्व केंद्र संचालक, जिल्हा सनियंत्रण कक्ष व परीक्षा परिषदेतील थेट संपर्क सुविधा राहणार आहे. या सर्व तांत्रिक उपाययोजनांमुळे TET परीक्षा इतिहासातील आतापर्यंतची सर्वाधिक पारदर्शक व कडक परीक्षा प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
अधिकाऱ्यांची नजर व आढावा बैठक
परीक्षा व्यवस्थेवर शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (योजना) यांच्या भरारी पथकाची लक्षवेधी नजर राहणार आहे. शिक्षणाधिकारी (प्राथ.) संपूर्ण कार्यवाहीचे नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.परीक्षापूर्व आढावा बैठक दि. २० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आयोजित करण्यात आली आहे.
अकोला जिल्ह्यातील परीक्षा केंद्रनिहाय परीक्षार्थी संख्या
केंद्र क्रमांक परीक्षा केंद्र पेपर 1 पेपर 2
6301 खंडेलवाल ज्ञान मंदिर विद्यालय 377 377
6302 जसनागरा पब्लिक स्कूल, रिधोरा 336 336
6303 श्री समर्थ पब्लिक स्कूल 336 336
6304 भिकमचंद खंडेलवाल विद्यालय 288 288
6305 द नोएल इंग्लिश CBSE स्कूल 288 288
6306 श्री शिवाजी हायस्कूल, मेन ब्रांच 245 245
6307 न्यू इंग्लिश हायस्कूल 257 257
6308 भारत विद्यालय 226 226
6309 श्री शिवाजी कॉलेज 384 384
6310 स्कूल ऑफ स्कॉलर्स 360 360
6311 जागृती विद्यालय 288 282
6312 मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय 265 288
6313 श्री सरस्वती इंग्लिश विद्यालय 288 288
6314 श्री समर्थ पब्लिक स्कूल, रिधोरा 262 288
6315 सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय 0 253
6316 श्री. रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालय 0 219
6317 श्रीमती ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालय 0 240
6318 गुरुनानक विद्यालय 0 236
6319 ज्युबिली इंग्लिश हायस्कूल 0 213
6320 उस्मान आजाद उर्दू हायस्कूल 0 190

