85 candidates : तीन वर्षे रखडलेल्या 11 नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी यंदा चुरशीला आली असून राजकीय समीकरणांचे ध्रुवीकरण स्पष्टपणे दिसू लागले आहे. युती-आघाड्यांतील सूर वेगळे असताना बंडखोरांनी बंडखोरीऐवजी थेट पक्षांतराचा मार्ग स्वीकारला आहे. जिल्ह्यातील 7 ठिकाणी तिरंगी, 2 ठिकाणी दुरंगी तर २ ठिकाणी चौरंगी लढती होत आहेत. 11 पालिकांच्या अध्यक्षपदासाठी 85 तर सदस्यपदासाठी 1170 उमेदवार रिंगणात राहील्याने चुरस वाढली आहे. नगर पालिका निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

युती-आघाडीत विसंवाद, तर बंडखोरांचा ‘पक्षांतर’ मार्ग ; सात नगर पालिकांमध्ये रंगणार तिरंगी लढत
बुलढाणा : तीन वर्षे रखडलेल्या 11 नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी यंदा चुरशीला आली असून राजकीय समीकरणांचे ध्रुवीकरण स्पष्टपणे दिसू लागले आहे. युती-आघाड्यांतील सूर वेगळे असताना बंडखोरांनी बंडखोरीऐवजी थेट पक्षांतराचा मार्ग स्वीकारला आहे. जिल्ह्यातील 7 ठिकाणी तिरंगी, 2 ठिकाणी दुरंगी तर २ ठिकाणी चौरंगी लढती होत आहेत. 11 पालिकांच्या अध्यक्षपदासाठी 85 तर सदस्यपदासाठी 1170 उमेदवार रिंगणात राहील्याने चुरस वाढली आहे. नगर पालिका निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
रिंगणातील उमेदवार
नगर पालिका अध्यक्ष सदस्य
बुलढाणा ७ १२४
चिखली १३ ११३
देऊळगाव राजा ३ ७७
जळगाव जामोद ३ ८५
खामगाव ६ १३९
लोणार ८ ९४
मलकापूर १० १२५
मेहकर ७ १३१
नांदुरा ९ ९४
शेगाव १३ ११८
सिंदखेडराजा ६ ७०

