Saint Bhagat Maharaj :बार्शीटाकळी तालुक्यातील श्री क्षेत्र भगत महाराज संस्थान, चोहोगाव जुने (कोथळी खुर्द) येथे मुक्या प्राण्यांची आयुष्यभर सेवा करणारे संत भगत महाराज यांचा भव्य ६९ वा यात्रा महोत्सव ४ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.
69th Yatra Festival of Saint Bhagat Maharaj at Chohogaon

सायखेड : बार्शीटाकळी तालुक्यातील श्री क्षेत्र भगत महाराज संस्थान, चोहोगाव जुने (कोथळी खुर्द) येथे मुक्या प्राण्यांची आयुष्यभर सेवा करणारे संत भगत महाराज यांचा भव्य ६९ वा यात्रा महोत्सव ४ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.
सालाबादप्रमाणे यंदाही यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून बैलांवरील द्वारकाच्या स्पर्धा हे यात्रेचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. या स्पर्धेसाठी प्रा. डॉ. अभिजीत मुळे, विधीज्ञ गोपाल देशमुख, नितीन ढोबळे, उपसरपंच नारायण लोखंडे, विकास आडोळे, सरपंच शेषराव जाधव, सुनील इंगळे, सुरेश सुदाम इंगळे आदींच्या वतीने आठ आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. तसेच सहभागी सर्वांना अशोकराव कोहर यांच्यातर्फे प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जातील. यात्रेमधील दिंड्या व युवकांच्या क्रीडा आखाड्यातील मंडळांना सुरेश बबन इंगळे यांच्याकडून प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन संस्थानच्या वतीने सन्मान केला जाईल.
३ ऑक्टोबर रोजी आई माय देवस्थान, चोहोगाव येथून पालखी प्रस्थान करेल. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता ह. भ. प. वासुदेव महाराज गवळी, प्रकाश महाराज गावंडे, प्रभाकर उपाध्ये व रामदास शिंदे यांच्या हस्ते मंदिरात महापूजा पार पडेल. पालखी मिरवणुकीसाठी माऊली सांप्रदायिक महिला भजनी मंडळ, हातोला यांची साथ राहणार आहे. मंदिरातील पूजारी म्हणून नामदेव पारधी, आनंदा सनवारे, गोविंदा कोंगे व गजानन शिंदे कार्य करतील.
पालखी व्यवस्थापनाची जबाबदारी ह. भ. प. आत्माराम काळे महाराज, संतोष कांबळे गुरुजी, बाळू वानखेडे, बाळू कोहर, भालचंद्र हातोलकर, महादेव देवकर, शुभम खुळे, लक्ष्मण मोघाड, दिनेश पिंपळकर, पुंडलिक फाटे, दशरथ लोखंडे, हरी उदीमकर, सुभाष साठे, देविदास तिवाले, मनोहर जाधव आदींकडे सोपवण्यात आली आहे. संस्थानच्या वतीने महाप्रसाद, जागावाटप, आपत्ती व विद्युत व्यवस्थापन, वाहन व्यवस्था, पाणीपुरवठा आदींसाठी स्वतंत्र समित्या नेमण्यात आल्या आहेत.
५ ऑक्टोबर रोजी सुप्रसिद्ध गायक जीवन वानखेडे व स्वरगंध संच यांचा भक्ती संगीत, हिंदी व मराठी चित्रपट गीतांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. तसेच ह. भ. प. वासुदेव महाराज गवळी यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर दुपारी यात्रेकरू व भाविक भक्तांसाठी संस्थान परिसरात भव्य महाप्रसाद वाटपाचे आयोजन केले आहे.
या यात्रा महोत्सवाचा लाभ अकोला जिल्ह्यासह पंचक्रोशीतील सर्व भाविक व यात्रेकरूंनी घ्यावा, असे आवाहन चोहोगाव, कोथळी खुर्द, सायखेड, धामणदरी, केशवनगर, साखरविरा, लोहगड, देवदरी, वरखेड, किनखेड, धानोरा, चिंचोली देव, कोथळी बु्द्रुक, छावणी, धाबा, खडकी, धोतरखेड, जनुना, फेट्रा, हलदोली, जांभरुण, टिटवा, माळेगाव, जामवसु, मांडोली, मुंगसाजी नगर, चेलका, निंबी, तिवसा, राजनखेड येथील गावकरी मंडळी व संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

