Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

300 liters of fuel stolen : समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकमधील ३०० लिटर इंधन लंपास

300 liters of fuel stolen : बीबी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मांडवा शिवारातील समृद्धी महामार्गावर डिझेल चोरीची घटना समोर आली आहे. ३ जानेवारी २०२६ रोजी चॅनल क्रमांक ३१० येथे, पेट्रोल पंपाजवळील सर्व्हिस रोडवर उभ्या असलेल्या ट्रकच्या डिझेल टाकीतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३०० लिटर डिझेल लंपास केले.

300 liters of fuel stolen

रमेश खंडागळे 

बीबी : बीबी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मांडवा शिवारातील समृद्धी महामार्गावर डिझेल चोरीची घटना समोर आली आहे. ३ जानेवारी २०२६ रोजी चॅनल क्रमांक ३१० येथे, पेट्रोल पंपाजवळील सर्व्हिस रोडवर उभ्या असलेल्या ट्रकच्या डिझेल टाकीतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३०० लिटर डिझेल लंपास केले.

बीबी पोलीस स्टेशनपासून जवळच असलेल्या मांडवा शिवारात समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी पेट्रोल पंप तसेच चहा-पाण्यासाठी विश्रांतीस्थळ उपलब्ध आहे. त्यामुळे जड वाहन चालक येथे काही काळासाठी वाहने उभी करून विश्रांती घेतात व पुढील प्रवासाला निघतात.पीडित ट्रक चालक विवेक कुमार भोला (रा. नागपूर) हे एमएच-४० सीडी ३०९२ क्रमांकाच्या ट्रकने नागपूरहून मुंबईकडे जात असताना २ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अग्रवाल यांच्या स्वागत पेट्रोल पंपाजवळ थांबले. विश्रांतीसाठी ट्रकच्या केबिनमध्ये झोपताना त्यांनी तेथील खासगी सुरक्षा रक्षक संदीप सुखदेव शिरसागर यांना सकाळी जागवण्यास सांगितले होते.मात्र पहाटे तीन वाजता जागे झाल्यानंतर ट्रकची पाहणी करत असताना डिझेल टाकीचे झाकण उघडे असून डिझेल सांडलेले आढळले. तपासणीअंती टाकीतील सुमारे ३०० लिटर डिझेल (अंदाजे २७ हजार २२८ रुपये किमतीचे) चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यानंतर चालकाने बीबी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

तक्रारीवरून बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण सानप करीत आहेत.

दरम्यान, समृद्धी महामार्गावर यापूर्वीही अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्याचे काही वाहनचालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. कोर्ट-कचेरी व पोलीस ठाण्याच्या झंझटीपासून वाचण्यासाठी अनेक चालक तक्रार देत नाहीत, त्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत असून या प्रकरणाच्या तपासातून नेमके काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top