29 candidates : नगर पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी सदस्यपदाच्या 29 उमेदवारांनी माघार घेतली आहे. पालिकेत आतापर्यंत नगराध्यक्षपदाच्या वंचितच्या उमेदवार संगिता अर्चित हिरोळे यांनी माघार घेतली तर सदस्यपदाच्या चार उमेदवारांनी 20 नोव्हेंबर रोजी माघार घेतली होती.21 नोव्हेंबर रोजी आणखी 29 उमेदवारांनी माघार घेतली असून आता रिंगणात अध्यक्षपदासाठी 11 तर सदस्यपदासाठी 149 उमेदवार रिंगणात राहीले आहेत. माघार घेणाऱ्या सदस्यपदाच्या उमेदवारांमध्ये दोन वंचितच्या उमेदवारांचाही समावेश आहे.

बुलढाणा नगर पालिकेत लढतीचे चित्र स्पष्ट : अध्यक्षपदासाठी 11 तर सदस्यपदासाठी आता 149 उमेदवार रिंगणात
बुलढाणा : नगर पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी सदस्यपदाच्या 29 उमेदवारांनी माघार घेतली आहे. पालिकेत आतापर्यंत नगराध्यक्षपदाच्या वंचितच्या उमेदवार संगिता अर्चित हिरोळे यांनी माघार घेतली तर सदस्यपदाच्या चार उमेदवारांनी 20 नोव्हेंबर रोजी माघार घेतली होती.21 नोव्हेंबर रोजी आणखी 29 उमेदवारांनी माघार घेतली असून आता रिंगणात अध्यक्षपदासाठी 11 तर सदस्यपदासाठी 149 उमेदवार रिंगणात राहीले आहेत. माघार घेणाऱ्या सदस्यपदाच्या उमेदवारांमध्ये दोन वंचितच्या उमेदवारांचाही समावेश आहे.
बुलढाणा नगर पालिकेच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी 13 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एक अर्ज छानणीत बाद झाला होता तर एका उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे आता रिंगणात 11 उमेदवार राहले आहेत.यामध्ये खरी लढत ही शिंदेसेना, भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. सदस्यपदासाठी 248 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 66 उमेदवारांचे अर्ज छानणीमध्ये बाद झाले होते. तसेच 33 सदस्यांनी रिंगणातून माघार घेतली आहे. आता सदस्यपदासाठी 149 उमेदवार रिंगणात आहेत. 21 नोव्हेंबर रोजी माघार घेणाऱ्या शरद एकनाथ जैन, नारायण गौरीशकंर तोंडीलायाता, सुनिता अनुप श्रीवास्तव, यास्मीन फिरदोस निसार खान, मुकुंद पद्माकर देशपांडे, गजेंद्र बिदेश्वर अहिर, कौसर बी शे अब्दुल गणी, पूर्णिमा अशोक सुरडकर, नाना काशिनाथ सुरडकर, अनुप रामेश्वर गव्हाळे, शुभांगी उमेश भोंडे, विनायक राजाराम भाग्यवंत, अनंता शंकर शिंदे, विकास प्रकाश नांदवे, पुजा विकी आव्हाड, किसन जगदेव धुरंधर, विनोद फकीरा इंगळे, विद्यासागर प्रल्हाद अंभोरे, सुनिता कृष्णस्वामी पुट्टी, योगिता अंनता शिंदे, शहनाजबी शेख इलियास, अंजुम सय्यद मतीन, रामेश्वर शंकर जाधव, नंदकिशोर साहेबराव जाधव, , वर्षा गजानन इंगळे, किरण मंगळ नाईक, व्दारका नंदकिशोर जाधव, सागर पुंजाजी चव्हाण, योगिता कैलास माळी आदी उमेदवारांचा समावेश आहे.

