Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

MSEDCL : १२ हजार शासकीय कार्यालयांना लागले महावितरणचे स्मार्ट (टिओडी) मीटर 

MSEDCL : महावितरणचे स्मार्ट (टिओडी) मीटर हे पूर्णत: प्रमाणित असून अत्याधूनिक तंत्रज्ञानावर आधारीत आहे. त्यामुळे हे मिटर घरगुती आणि औद्योगिक वीज ग्राहकांसोबत डिसेंबर अखेरपर्यंत परिमंडळातील १२ हजार ३३६ शासकीय कार्यालयात लावण्यात आले आहेत. प्रत्येक महिन्याचे मीटर वाचन स्वंयचलीत पध्दतीने मीटरव्दारेच होणार असल्याने सरासरी वीजबिल, मीटर रिडींग झाले नाही, अशा तक्रारी शुन्य होवून वीज ग्राहकांना अचूक आणि वेळेत वीज बिल मिळणार आहे.

MSEDCL'

बुलढाणा : महावितरणचे स्मार्ट (टिओडी) मीटर हे पूर्णत: प्रमाणित असून अत्याधूनिक तंत्रज्ञानावर आधारीत आहे. त्यामुळे हे मिटर घरगुती आणि औद्योगिक वीज ग्राहकांसोबत डिसेंबर अखेरपर्यंत परिमंडळातील १२ हजार ३३६ शासकीय कार्यालयात लावण्यात आले आहेत. प्रत्येक महिन्याचे मीटर वाचन स्वंयचलीत पध्दतीने मीटरव्दारेच होणार असल्याने सरासरी वीजबिल, मीटर रिडींग झाले नाही, अशा तक्रारी शुन्य होवून वीज ग्राहकांना अचूक आणि वेळेत वीज बिल मिळणार आहे.

राज्यात कृषी ग्राहक वगळता सर्वच वर्गवारीतील वीज ग्राहकांना स्मार्ट (टिओडी) मीटर लावण्यात येत आहेत. यात शासकीय कार्यालयाचा देखील समावेश आहे. नवतंत्रज्ञानावर आधारीत असलेले हे मिटर तांत्रिकदृष्या अधिक स्मार्ट असले तरी हे मीटर मोफत बसविण्यात येत आहे, त्यामुळे याचा वीज ग्राहकांना कुठलाच आर्थिक भुर्दंड बसणार नाही. शिवाय या मीटरमध्ये मानवी हस्तक्षेपाला वाव नाही.

अकोला परिमंडळात टप्या – टप्प्याने सर्वच वर्गवारीतील (कृषी ग्राहक वगळून) वीज ग्राहकांना स्मार्ट ( टिओडी) मीटर बसविण्यात येत असून, सुरूवातीच्या काळात शासकीय कार्यालये, शासकीय निवासस्थाने, मोबाईल टॉवर, नादुरूस्त असलेले मीटर या ठिकाणी मीटर बसविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय नविन वीज जोडणी देतांनाही स्मार्ट (टिओडी) मीटर बसविण्यात येत असून सोलर नेट मीटरींगसाठी त्याचा वापर करण्यात येत आहे.

अकोला परिमंडळात विविध शासकीय कार्यालयात बसविण्यात आलेल्या १२ हजार ३३६ मीटरपैकी अकोला जिल्ह्यात ३ हजार ८४६, बुलडाणा जिल्हा ५ हजार ८२३ आणि वाशिम जिल्ह्यातील २ हजार ६६७ शासकीय कार्यालयांना स्मार्ट (टिओडी) मीटर बसविण्यात आले आहे.

स्मार्ट (टिओडी) मीटर हे अत्याधूनिक तंत्रज्ञानावर आधारीत असल्याने ग्राहकांना वीज वापराचे अचूक वीजबिल मिळणार आहे. तसेच मोबाईल एप्लिकेशनच्या माध्यमातून प्रतितासाचा वीज वापर वापरकर्त्यांनाच कळत असल्याने, वीज वापरावर नियंत्रण मिळविण्यास मदत होते. त्यामुळे बदलते तंत्रज्ञान ग्राहक सेवा आणि ग्राहकांच्या फायद्याचे आहे. वीज ग्राहकांना मीटर बाबत शंका असल्यास शंकेचे निरसण करण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top