illegal liquor sale : गुडधी परिसरात हाेत असलेल्या अवैध दारु विक्रीविरुद्ध महिलांनी एल्गार पुकारात आंदाेलन केले. संतप्त झालेल्या महिलांनी एकत्र येत दारु अड्डा उद्धस्त केला.

अकाेला : गुडधी परिसरात हाेत असलेल्या अवैध दारु विक्रीविरुद्ध महिलांनी एल्गार पुकारात आंदाेलन केले. संतप्त झालेल्या महिलांनी एकत्र येत दारु अड्डा उद्धस्त केला. दारू विक्री होत असलेल्या टीन शेडची ताेडफाेड करीत दारु बाॅटलही ताेडल्या. पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दारु विक्री बंद न झाल्यास तीव्र आंदाेलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला. महिलांच्या या आंदाेलनामुळे अवैध दारु विक्रीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध दारु विक्री सुरु असल्याचा आराेप हाेत आहे. धाबे, हाॅटेल्स, अंडे आमलेटची विक्री हाेणाऱ्या काही ठिकाणी अवैध दारु विक्री हाेते. अनेक गावांमध्ये दारु विक्री बंदसाठी ठरावही घेण्यात येतात. दारु विक्रीचा सर्वाधिक त्रास हा महिलांना सहन करावा लागताे. महिलांनी यापूर्वी अनेकदा सरकारी यंत्रणांना निवेदनेही दिले. मात्र त्यानंतरही फारसा फरक पडत नाही. दरम्यान अाता दारु विक्री विराेधात महानगरानापासून जवळच असलेल्या गुडधी परिसरात महिलांनी जाेरदार आवाज उठवला आहे. महिलांनी दारु विक्री हाेत असलेल्या टिनशेडकडे धाव घेतली. हे टिनशेड पाडत आपला संताप व्यक्त केला.