Women’s ODI World Cup : येत्या ३० सप्टेंबरपासून भारत आणि श्रीलंकेत महिलांची एकदिवसीय सामान्यांच्या विश्वचषक स्पर्धेत सुरूवात हाेणार आहे. या स्पर्धेसाठी विजेत्या संघाच्या पुरस्कार रकमेत माेठी वाढ करण्यात आली आहे. विश्वचषक स्पर्धेतील विजेत्या संघाला तब्बल ४४.८० लाख डॉलर (सुमारे ३९.५५ कोटी रुपये) इतकी विक्रमी बक्षीस रक्कम मिळणार आहे.
दुबई: येत्या ३० सप्टेंबरपासून भारत आणि श्रीलंकेत महिलांची एकदिवसीय सामान्यांच्या विश्वचषक स्पर्धेत सुरूवात हाेणार आहे. या स्पर्धेसाठी विजेत्या संघाच्या पुरस्कार रकमेत माेठी वाढ करण्यात आली आहे. विश्वचषक स्पर्धेतील विजेत्या संघाला तब्बल ४४.८० लाख डॉलर (सुमारे ३९.५५ कोटी रुपये) इतकी विक्रमी बक्षीस रक्कम मिळणार आहे. या स्पर्धेतील बक्षीस रक्कम ही पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक २०२३ (१० दशलक्ष डॉलर सुमारे ८८.२६ कोटी रुपये) पेक्षाही जास्त आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केले की, विजेत्या संघासाठी बक्षिसाच्या रकमेत १३.२० लाख डॉलर (सुमारे ११.६५ कोटी रुपये) इतकी वाढ करण्यात आली आहे. या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील एकूण बक्षीस रक्कम जवळपास चारपट वाढवून १३.८८ दशलक्ष डॉलर (सुमारे १२२.५ कोटी रुपये) इतकी निश्चित करण्यात आली आहे.
याआधी, न्यूझीलंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेतील एकूण बक्षिसाची रक्कम केवळ ३१ कोटी रुपये होती. त्यामानाने आता २९७% वाढ करण्यात आली आहे.
असे मिळणार संघाना बक्षीसाची रक्कम
विश्वविजेता संघ : ४४.८ लाख डॉलर (३९.५५ कोटी रुपये)
उपविजेता संघ : २२.४ लाख डॉलर (१९.७७ कोटी रुपये)
उपांत्य फेरीत पराभूत संघ : प्रत्येकी ११.२ लाख डॉलर (९.८९ कोटी रुपये)
गट फेरीतील प्रत्येक विजय : ३४,३१४ डॉलर (३०.२९ लाख रुपये)
पाचवे व सहावे स्थान : प्रत्येकी ७ लाख डॉलर (६२ लाख रुपये)
सातवे व आठवे स्थान : प्रत्येकी २.८ लाख डॉलर (२४.७१ लाख रुपये)
सहभागी प्रत्येक संघाला : २.५ लाख डॉलर (२२ लाख रुपये)