Woman killed :अरस्त्याने जात असलेल्या महिलेला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यामध्ये ५५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील देऊळगाव मही येथे १ सप्टेंबर राेजी घडली. विठाबाई पुंडलिक बनसाेडे असे मृतक महिलेचे नाव आहे.

गजानन तिडके
देऊळगाव राजा : रस्त्याने जात असलेल्या महिलेला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यामध्ये ५५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील देऊळगाव मही येथे १ सप्टेंबर राेजी घडली. विठाबाई पुंडलिक बनसाेडे असे मृतक महिलेचे नाव आहे.
देऊळगाव मही येथील विठाबाई पुंडलिक बनसोडे या १ सप्टेंबर राेजी दिग्रस रोडने आपल्या शेतामध्ये जात असताना अज्ञात वाहनाच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे तसेच वेगाने चालवून त्यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्या गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालय देऊळगाव मही येथे नेले असता प्राथमिक उपचारानंतर जालना येथील घाटी रुग्णालयात रेफर करण्यात आले. त्यांचा उपचारादरम्यान ५ सप्टेंबर राेजी मृत्यू झाला. घटनेची फिर्याद रामेश्वर कुंडलिक बनसोडे यांनी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून अज्ञात वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कलीम देशमुख करीत आहेत.