Pangri Ugale Lake : पांगरी उगले शिवारात झालेल्या अतिवृष्टीमुळे गावाच्या वरच्या भागाला असलेल्या पाझर तलावांच्या भिंतीला भगदाड पडले असून पाझर तलावाची भिंत फुटण्याची भीती निर्माण झाली आहे . त्यामुळे पांगरी उगले गावाकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे . तलाव फुटण्याच्या भितीने संपूर्ण गाव जिवमुठीत धरून असून काल ची रात्र गावकऱ्यांनी जागून काढली.
साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यात संततधार पावसामुळे सर्व पाझर तलाव भरले आहेत. या पाझर तलावांची दुरुस्ती नसल्याने अनेक पाझर तलाव धोक्याचा बिगुल वाजवीत आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.पांगरी उगले शिवारात झालेल्या अतिवृष्टीमुळे गावाच्या वरच्या भागाला असलेल्या पाझर तलावांच्या भिंतीला भगदाड पडले असून पाझर तलावाची भिंत फुटण्याची भीती निर्माण झाली आहे . त्यामुळे पांगरी उगले गावाकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे . तलाव फुटण्याच्या भितीने संपूर्ण गाव जिवमुठीत धरून असून काल ची रात्र गावकऱ्यांनी जागून काढली.
परिसरात १ सप्टेंबर रोजी ढगफुटी सदृश्य पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाझर तलाव काठोकाठ भरला आहे . अनेक वर्षांपासून पाटबंधारे विभागाचे अधिकारी तथा कर्मचारी वेळोवेळी देखभाल व दुरुस्ती करीत नसल्याने तलावातून बाहेर जाणारा सांडवा दगड मातीने बुजून गेला होता. त्यातच तलावाच्या भिंतीला मधोमध भगदाड पडले. २६ ऑगस्टला पडलेल्या ढगफुटी सदृश्य पाऊस व लगेचच दुसरे दिवशी २७ ऑगस्टला झालेल्या पावसामुळे तलाव काठोकाठ भरला.
तलावाला पडलेल्या भगदाडामुळे तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे याबाबत गावकऱ्यांनी संबंधित विभागाला माहिती पुरवली असून अजूनही कु़भकर्णी झोपेत असलेल्या पाटबंधारे प्रशासनाला जाग आलेली नाही .तरी संबंधित विभागाने ताबडतोब उपाययोजना करण्याची गरज आहे.
तालुक्यातील इतर तलावांचीही दुरवस्था
सोयंदेव येथील सुतार तलावाची अवस्था अशीच झाली आहे . या तलावाला झाडाझुडुपांमध्ये वेढला गेला आहे . अनेक ठिकाणी बीळं तयार झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी पाझरत आहे. तालुक्यातील काही तलाव जिल्हा परिषद सिंचन विभागाकडे तर काही तलाव सार्वजनिक सिंचन विभागाकडे आहेत . या अगोदर जांभोरा येथील पाझर तलाव फुटला असून शेकडो एकर शेत जमीनी वरील पीके बाधील झाली आहे . वरोडी येथील पाझर तलावाची अवस्था बिकट झाली आहे . एकांबा तलाव भरल्यानंतर सांडव्यातून पाणी मोकळे वाहत नसल्याने या तेलाच्या भिंती पर्यंत पाणी आले आहे . साखरखेर्डा येथील महालक्ष्मी तलावाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे वाढली आहे . गायखेडी तलाव झाडाझुडपांनी वेढले आहे . गुंज माथा शिवारातील दोन पाझर तलाव भरले असून धोक्याची घंटा वाजवीत आहे . राजेगाव तलाव भरले आहे . सांडव्याची दुरुस्ती नसल्याने पाणी मोठ्या प्रमाणात वाहात आहे . कोणाटी, कुंबेफळ शिवारातील तलाव हा १०० टक्के भरला असून त्याची देखभाल व दुरुस्ती महत्वाची आहे .
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी शिवसेना नेते छगन दादा मेहेत्रे , रमेश खरात जांभोरा , वरोडीचे सरपंच सुधाकर गारोळे , गुंज येथील सरपंच सुरेश तुपकर , साखरखेर्डा येथील माजी सरपंच महेंद्र पाटील , सुनील जगताप , संतोषराव शिंगणे यांनी केली आहे .