mahabreaking.com

Mahadev Jankar : शेतकरी राजाला सुखी करण्यासाठी शासनाने तत्काळ मदत करावी :  जानकर

Mahadev Jankar :  परिसरात झालेल्या अतिवृष्टीने पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात कोण लोकप्रतिनिधी आहे, यापेक्षा लोकांच्या अडी अडचणी कोण सोडवितो याकडे जनता डोळस नजरेतून पाहात असते. या भागातील शेतकरी संकटात सापडलेला असल्याने जिल्हाधिकारी , जिल्हा कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पंचनामे करून शासनाकडे पाठवावे.

Mahadev Jankar

साखरखेर्डा : परिसरात झालेल्या अतिवृष्टीने पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात कोण लोकप्रतिनिधी आहे, यापेक्षा लोकांच्या अडी अडचणी कोण सोडवितो याकडे जनता डोळस नजरेतून पाहात असते. या भागातील शेतकरी संकटात सापडलेला असल्याने जिल्हाधिकारी , जिल्हा कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पंचनामे करून शासनाकडे पाठवावे. त्याचा पाठपुरावा निश्चित केला जाईल. शेतकरी राजाला सुखी करण्यासाठी शासन कर्ज माफी करणार आहे. त्यांनी निवडणूकीत आश्वासन दिले उशिरा का होईना कर्ज माफी करतो म्हणून आता बोलायला लागले आहे, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. शिंदी आणि साखरखेर्डा भागाची पाहणी करताना ते शेतकऱ्यांशी संवाद साधतांना बाेलत हाेते. यावेळी तहसीलदार अजित दिवटे यांना फोन करून शेतकऱ्यांच्या वतीने संभाषण केले .
शिंदी येथील काही शेतकऱ्यांच्या शेती मेरा बु . शिवारात असून या शेतात पराड्याचे पाणी वाहात येऊन शेतात शिरले. त्यामुळे जमीनी खरडल्या , पिके वाहून गेली. शिंदी येथील गावात पाणी शिरल्याने ४० ते ५० घरांचे नुकसान झाले . आजही शेतात पाणी साचलेले आहे. सोयाबीन शेंगावर बुरशी वाढल्याने शेंगा काळ्या पडून गळती लागली आहे . एकरी एक क्विंटल उत्पादन सुध्दा निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी व्यथा यावेळी रमेश खरात , नितेश खरात , मंगेश बंगाळे , संतोष खरात , राहुल खंडारे , किरण खंडारे , सुनील खंडारे , रतन खंडारे , आप्पा आटोळे , विशाल आटोळे यांनी जानकर यांच्याकडे मांडली .
यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ तौसीफ शेख , प्रदेश सचिव संजय कन्नावार , नरेश मंडल , जिल्हाध्यक्ष कारभारी गायकवाड , संपर्क प्रमुख अतुल भुसारी , तालुका अध्यक्ष संतोष वनवे , सचिन खंडारे , देवानंद खंडागळे, अमित जाधव यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top