mahabreaking.com

Ganpati Bappa Morya: गणपती बाप्पा माेरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघाेषाने वाडेगाव नगरी दुमदुमली

Ganpati Bappa Morya: गणपती बाप्पा माेरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघाेष करीत वाडेगावात गणपती बाप्पांना निराेप  देण्यात आला. येथील २३ सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. सायंकाळी ४ वाजता बेसिक शाळेच्या मार्गावर पोहचून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.

Ganpati Bappa Morya

राहुल सोनोने
वाडेगाव: गणपती बाप्पा माेरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघाेष करीत वाडेगावात गणपती बाप्पांना निराेप देण्यात आला. येथील २३ सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. सायंकाळी ४ वाजता बेसिक शाळेच्या मार्गावर पोहचून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
     सर्वप्रथम चिंचोळकर विद्यालयात गणेश मंडळाच्या पोलिस प्रशासन कडून लकी ड्रॉ द्वारे नंबर ठेवण्यात आले.त्यानुसार रांगा लावून त्या मागे वाजंत्री बँड , डिजे ,प्रारपरिक वाद्य , च्या निनादात भव्य दिव्य मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. तर यावेळी तांदळी येथील मानाच्या गणपतीची भव्य पूजा करून बैलगाडीवर बसून तो ग्रामस्थ भाविकांच्या हाताने पूजा करून मार्गस्थ करण्यात आले. त्यानंतर मिरवणुकीला मुख्य मार्गाने सुरुवात झाली.मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी आदींनी गणेश मंडळाच्या रथा वर पूजन केले.यावेळी गावातील सरपंच मंगेश तायडे, उपसरपंच राजू पळसकर, तंटामुक्ती अध्यक्ष सागर सरप,प प्रकाश कंडाकर,शामलाल लोध,अरुण हुसे ,गणेश कांडारकर,सदानंद भुस्कुटे,चेतन कारंजकर,संदीप घाटोळ,रवी सरप,घाटोळ,सुधाकर भारसकले,दीपक मसने,अनंत काळे,सुनील घाटोळ,आदी गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित हाेते.
ठाणेदार, तहसीलदार,यांच्यासह पोलीस व महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
काँग्रेस कमिटी कडून मंडळाचे स्वागत
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी असलेल्या गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत प्रशासन ,पोलिस प्रशासन पत्रकार मंडळी तंटामुक्ती समिती व शांतता समिती सदस्य यांचा भव्य शाल हार फुलांनी स्वागत करण्यात आले आहे.यावेळी काँग्रेसचे प्रकाश तायडे,माजी जि.प. सदस्य हिम्मतराव घाटोळ,शिवसेना नेते दीपक मसने,अनंता काळे, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष सुश्रुत भुस्कुटे ,वाडेगाव शहर अध्यक्ष सचिन धनोकार,अविनाश कळसकर,काजी दानिश,अनिरुद्ध घाटोळ,श्रीकांत मसने आदींसह इतर उपस्थित हाेते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top