mahabreaking.com

Terrible accident : अकाेला ते पातूर रस्त्यावर भीषण अपघात, एक ठार,तीन गंभीर 

Terrible accident : गणेश विसर्जन करून परत येत  असलेल्या भाविकांच्या वाहनाचा कापशी येथील उड्डाणपुलाजवळ ६ सप्टेंबर राेजी सायंकाळी अपघात झाला. यामध्ये एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. उड्डाणपुलाच्या गावाकडील बाजुस सर्व्हिस राेड नसल्याने अपघात वाढले आहेत. अपघातातील मृतक आणि जखमी हे अकाेला शहरातील असल्याचे समजते.

Terrible accident

राहुल साेनाेने

वाडेगाव : गणेश विसर्जन करून परत येत असलेल्या भाविकांच्या वाहनाचा कापशी येथील उड्डाणपुलाजवळ ६ सप्टेंबर राेजी सायंकाळी अपघात झाला. यामध्ये एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. उड्डाणपुलाच्या गावाकडील बाजुस सर्व्हिस राेड नसल्याने अपघात वाढले आहेत. अपघातातील मृतक आणि जखमी हे अकाेला शहरातील असल्याचे समजते.
अकाेला शहरातील शिवसेना काॅलनीतील भाविक गणेशाचे विसर्जन करण्यासाठी कापशी येथील तलावावर गेले हेाते. गणेश विसर्जन करून परत येत असताना भरधाव कार आणि दुचाकीची समाेरासमाेर धडक झाली. यामध्ये एक जण जागीच ठार तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, “सर्व्हिस रोडच्या अभावी वारंवार जीव घेतले जात आहेत. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात” अशी मागणी संतप्त ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top