Suspension of medical officers : बोराखेडी आणि देऊळगाव माळी ता.मेहकर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी २० ऑगस्ट राेजी निलंबित केले हाेते. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या निलंबनाला न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने यासंदर्भात महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत निलंबनाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

डोणगाव : बोराखेडी आणि देऊळगाव माळी ता.मेहकर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी २० ऑगस्ट राेजी निलंबित केले हाेते. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या निलंबनाला न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने यासंदर्भात महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत निलंबनाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निलंबनाचे अधिकारच नसल्याचा मुद्दा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला, त्यानंतर न्यायालयाने आणखी काही बाबी पडताळून पाहिल्यानंतर निलंबनाच्या आदेशाला बोराखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक थिगळे आणि देऊळगाव माळी ता.मेहकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल सुरुशे यांनी गुलाबराव खरात यांनी केलेल्या निलंबनाच्या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले होते. निलंबन आदेशात दाखल केलेला आरोप लहान स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. निलंबनापूर्वी अर्जदाराला कोणतेही कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली नसल्याचेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले, त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी २० ऑगस्टला काढलेल्या निलंबन आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली असून, पुढील अंतिम सुनावणी २२ सप्टेंबर रोजी होणार असल्याची न्यायालयीन सूत्रांकडून कळाले आहे.