Strong earthquake in Afghanistan; पूर्व अफगाणिस्तानमध्ये, पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या भागाला ६.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला असून मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. तालिबान सरकारच्या माहितीनुसार या भूकंपात ८०० हून अधिक जणांचा मृत्यू, तर १,५०० पेक्षा जास्त जखमी झाल्याची नोंद आहे.
कंदहार : पूर्व अफगाणिस्तानमध्ये, पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या भागाला ६.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला असून मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. तालिबान सरकारच्या माहितीनुसार या भूकंपात ८०० हून अधिक जणांचा मृत्यू, तर १,५०० पेक्षा जास्त जखमी झाल्याची नोंद आहे.
सर्वाधिक मृत्यू कुनार प्रांतात झाल्याचे सांगितले जाते. हा भाग अतिशय दुर्गम आणि डोंगराळ असल्याने मदतकार्य कठीण ठरत आहे. भूकंपामुळे माती व दगडांनी बनलेली घरे कोसळली असून, भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले आहेत. जखमींना ढिगाऱ्यातून बाहेर काढून हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. तसेच, बेपत्ता नागरिकांचा शोध सुरूच आहे.
भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानातील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर जलालाबादपासून सुमारे २७ किमी अंतरावर होते. जलालाबाद हे नांगरहार प्रांताची राजधानी आहे.
बीबीसी अफगाण सर्व्हिसचे प्रतिनिधी हाफिजुल्लाह मारुफ यांनी कुनार प्रांतातील अनेक सूत्रांशी बोलताना सांगितले की, “शेकडो जणांचे मृत्यू झाल्याची शक्यता आहे.”